मारेगावच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “वाणिज्य मंडळाचे थाटात उद्घाटन “
सुरेंद्र इखारे वणी :- मारेगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागाद्वारे ” वाणिज्य मंडळाचे थाटात उद्घाटन करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ. माधुरी तानुरकर ह्या होत्या . प्रमुख मार्गदर्शक मुंबई येथील प्राध्यापक डॉ. हेमंत भट्टी ,
तसेच प्रमुख पाहुणे वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ. प्रवीण कुलकर्णी सर उपस्थित होते .
याप्रसंगी डॉ हेमंत भट्टी यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन करीत असताना वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त करून कशात करिअर करता येईल कोणत्या नवीन संधी मिळविता येईल याबाबत सखोल अशी माहिती दिली . तसेच मनी मॅनेजमेंट च्या संदर्भात अतिशय उत्तम मार्गदर्शन करून शेअर मार्केट आणि डिमॅट अकाउंट काय आहे त्याचा उपयोग कसा करायचा व तो कसा फायदेशीर ठरतो याबाबत उत्तम माहिती दिली
तसेच अध्यक्षीय भाषणातून वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. माधुरी तानुरकर यांनी वाणिज्य मंडळाचे अंतर्गत येणाऱ्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना कसे वाव देता येईल याबाबत प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य शाखेचे प्रा डॉ संतोष गायकवाड यांनी केले तर आभार वाणिज्य शाखेचे प्रा संकेत पुनवटकर यांनी मानले . याप्रसंगी वाणिज्य मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि तसेच वाणिज्य शाखेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहकार्य केले




