Wednesday, November 12, 2025
Google search engine

कायर चा “बुद्धिवान ” सलग 5 वर्षात 8 पदांना गवसणी घालणारा 

  कायर चा “बुद्धिवान ” सलग 5 वर्षात 8 पदांना गवसणी घालणारा 
*Deputy superintendent Of Police/ CO Class1*
सुरेंद्र इखारे वणी :-    वणी तालुक्यातील कायर या गावचे बिंबिसार निखाडे या शेतकऱ्यांचे पुत्र बुद्धिवान(प्रशांत) बिंबिसार निखाडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कायर येथे झाले माध्यमिक शिक्षण कायर येथील विवेकानंद विद्यालयात तर  महाविद्यालयीन शिक्षणासाठी एसपीएम कॉलेज वणी येथे अकरावी बारावी विज्ञान शाखेत बिना शिकवणी करता प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण करून ग्रॅज्युएशन साठी लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे बीएससी साठी प्रवेश घेतला तीन वर्ष सातत्यपूर्ण अभ्यास करून शेवटच्या वर्षाला त्यांनी ठरवलं की पुणे येथे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा 2017 मध्ये पुणे येथे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला 2 वर्ष सतत अभ्यास केल्यानंतर 2019 च्या शेवटच्या वर्षात कोरोना ने त्यांना गावी यावे लागले 2020 मध्ये एक वर्ष त्यांनी घरी अभ्यास केला त्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या संयुक्त परीक्षेत PSI,STI,ASO आणि 2021 च्या आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या संयुक्त परीक्षेत दुसऱ्यांदा PSI STI ASO अशा कोरोना महामारीने रखडलेल्या परीक्षेचा निकाल एकदाच 15 दिवसाच्या अंतराने लावण्यात आला आणि एकदाच सलग 6 उच्चपदस्थ पदांना गवसणी घालणारा अवलिया गावाने तालुक्याने पाहिला तेव्हाच 2021 च्या राज्यसेवेचा अंतिम पेपर आणि मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून रुजू होण्याची धावपळ यामुळे 2021 च्या मुख्य परीक्षेत हुलकावणी बसली त्यानंतर 2022 च्या परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारली पण थोडक्यात पोस्टने हुलकावणी दिली पुन्हा त्याच जोमाने 2023 च्या राज्यसेवेचा अभ्यास केला व 2023 च्या राज्यसेवेत मुलाखती नंतर त्यांची सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली व परत एकदा गावात जल्लोष झाला सध्या ते सहायक गटविकास अधिकारी म्हणून प्रशिक्षण कालावधीत नागपूर येथे वनामती प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे आहेत काल दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निकालात 561.25 गुणांसह महाराष्ट्रातून अनुसूचित जातींमध्ये पहिला येण्याचा मान मिळविला, व त्यांच्यासमोर आता Dysp (Deputy superintendent Of Police) पोलिस उपअधीक्षक आणि CO Class1 मुख्याधिकारी (नगरपरिषद) पर्याय आहे. त्यांच्या या दिशावरून असे दिसून येते की उच्च पदांना गवसणी घालायची असल्यास शहरातून महानगरातून शिक्षण अथवा अभ्यास केला तरच यश मिळते असे दिसून येत नाही तर सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन याच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही आपली प्रतिभा दाखवून गावाचे तालुक्याचे नाव उज्वल करू शकतात. बुद्धिमान यांचा स्वभाव प्रेमळ आणि नम्र असल्यामुळे परिसरातील अभ्यास करणारे विद्यार्थी नम्रपणे त्यांना काही विचारल्यास ते हसतमुखाने मार्गदर्शन करतात त्यामुळे ते मित्रांमध्ये खूप प्रिय, आहेत त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना एक ऊर्जात्मक प्रेरणा मिळेल बुद्धिमान म्हणाला, “माझे यश महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी अर्पण करतो” त्यांच्या या यशांची परंपरा 2020 पासून सुरू होऊन 2025 पर्यंत अशीच अविरत चालू आहे,
दिवाळी संपून एक आठवडा झाला तरी काल बुद्धिवान च्या यशाच्या जल्लोषात कायर येथील त्यांच्या मेडिकल समोर जे त्यांच्याच नावाने *प्रशांत मेडिकल* समोर फटाक्यांच्या आतिशबाजी ने आसमंत दुमदुमून गेला
2020 मध्ये PSI (पोलिस उपनिरीक्ष ,STI (राज्य करनिरीक्षक),ASO(सहाय्यक कक्ष अधिकारी )
2021 मध्ये PSI (पोलिस उपनिरीक्ष ,STI (राज्य करनिरीक्षक),ASO(सहाय्यक कक्ष अधिकारी )
2023 मध्ये Ass.BDO सहा. गटविकास अधिकारी
2025 मध्ये Deputy superintendent Of Police/ CO Class1
प्रशांत म्हणत असेल MPSC ला
तुम्ही काढा किती अवघड पेपर काढता तर, I’m ready
त्यांच्या या यशामुळे गावाबरोबर तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावर गाजत आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular