वणीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने फलकाचे अनावरण व चौकाचे नामकरण सोहळा
सुरेंद्र इखारे वणी :- येथील नारायण निवास चौक जत्रा रोड येथे दिनांक 2 नोव्हेंबर2025 रोज रविवारला सकाळी 10 .00 वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे जयंतीनिमित्ताने श्री संत नामदेव महाराज यांच्या फलकाचे अनावरण व चौकाचे नामकरण कार्यक्रमाचे उडघटक वणी विधानसभेचे विद्यमान आमदार संजयभाऊ देरकर यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, पांडुरंग भांडरवार, कुंतलेश्वर तुरविले, गजानन कासावार, अरुण पावडे, मोरेश्वर उज्ज्वलकर, प्रीतिताई बिडकर, व समस्त शिंपी समाज उपस्थित राहणार आहे. तेव्हा समस्त बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन वणी तालुका शिंपी समाज संस्थेने केले आहे.




