Tuesday, March 10, 2026
Google search engine

आयआयआयटी, नागपूरचा पाचवा दीक्षांत समारंभ उत्साहात

आयआयआयटी, नागपूरचा पाचवा दीक्षांत समारंभ उत्साहात
जयंत साठे नागपूर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ने आपला पाचवा दीक्षांत समारंभ (दिनांक ११ नोव्हेंबर) साऊथ अंबाझरी रोड, नागपूर येथील ऑडिटोरियम येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला. या दीक्षांत समारंभाला मोठ्या संख्येने विद्यार्थी – सहावी उत्तीर्ण बॅच, त्यांचे पालक आणि देशभरातील इतर भागधारक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम उपस्थित होते. तसेच आयआयआयटी नागपूरच्या गव्हर्नर्स मंडळाचे अध्यक्ष दीपक घैसास यांनी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले.
पाचव्या दीक्षांत समारंभात, संस्थेने ४३१ पदव्या प्रदान केल्या ज्यामध्ये ०८ पीएच.डी. पदव्या, २५ माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, ६९ विद्यार्थ्यांना माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका आणि ३२९ विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी
यांचा समावेश होता.
कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेतील जोहान मायकेल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतील कु. गुरुवेल्ली चैत्रा यांना“अवॉर्ड ऑफ मेरिट” ने सन्मानित करण्यात आले.
सर्व शाखांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल “इन्स्टिट्यूट एक्सलन्स अवॉर्ड”, हा सर्वोच्च शैक्षणिक पुरस्कार, जोहान मायकेल यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा. टी. जी. सीताराम यांनी क्रांतिकारी डिजिटल शतकाच्या युगावर भर दिला, जो तांत्रिक नवोपक्रम, जागतिक सहकार्य आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चालना मिळवतो. त्यांनी पदवीधरांना समस्या सोडवणारे आणि राष्ट्रनिर्माते बनण्याचा सल्ला दिला.
विद्यार्थ्यांनी सतत ज्ञान अद्यवनित करत राहावे आणि सर्जनशीलता यांच्या माध्यमातून उद्देशपूर्ण नेतृत्व करत “विकसित भारत” घडविण्यास हातभार लावावा.
दीपक घैसास म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत व नवोपक्रम आणि प्रामाणिकतेच्या माध्यमातून एक बलवान आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यास योगदान द्यावे.
अभियंते हे केवळ तंत्रज्ञ नाहीत, त्यांनी सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी तांत्रिक उत्कृष्टतेला सहानुभूती, शाश्वतता आणि सामाजिक जबाबदारीसह एकत्र केले पाहिजे.
समारंभाची सुरुवात शैक्षणिक मिरवणुकीने झाली. आयआयआयटी नागपूरचे संचालक डॉ. प्रेमलाल पटेल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नेहा कस्तुरे आणि डॉ. माधुरी तायडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव कैलास डाखले यांनी आभार मानले.दीक्षांत समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular