Tuesday, January 13, 2026
Google search engine

कायरच्या विद्यालयात “उजास” उपक्रमांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती

कायरच्या विद्यालयात “उजास” उपक्रमांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती

आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या  माध्यमातून जनजागृती

सुरेंद्र इखारे वणी   :-    कायर येथील विवेकानंद विद्यालयात दिनांक 4 डिसेंबर2025 रोजी “ उजास” उपक्रमांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक  सु रा इखारे हे होते. प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव सतीश घुले, प्रमुख मार्गदर्शक ऋतुजा नैताम ,सहायक शिक्षिका सोनाली भोयर,मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, उपस्थित होते.

याप्रसंगी ऋतुजा नैताम मार्गदर्शन करताना म्हणाल्या  की आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून उजास उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन 5 ते 12 वि च्या किशोरवयीन मुले,मुली पालक व शिक्षक यांचे सक्षमीकरण करण्यासाठी यांच्या सोबत मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन व जनजागृती करून विद्यार्थ्यांच्या मनातील असलेली भीती व गैरसमज दूर करून त्यांना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले असे प्रतिपादित केले.

या कार्यक्रमाला आकाश बोरूले, दिलीप कंदस्वार विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक  शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular