कायरच्या विवेकानंद विद्यालयात गणित व विज्ञान विषयाची कार्यशाळा संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालय येथे मराठी विज्ञान परिषद व गणित अध्यापक मंडळाचे संयुक्तविद्यामाणे गणित व विज्ञान या विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते प्रमुख मार्गदर्शक व विशेष अतिथी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. महादेवराव खाडे सर तसेच योगशिक्षक तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख लक्ष्मणराव इद्दे सर संस्थेचे सचिव तथा शारीरिक शिक्षण सतीश घुले सर, विज्ञान शिक्षक मधुकर घोडमारे सर, भाषा शिक्षक रविकांत गोंडलावार सर, गणित शिक्षिका सोनाली भोयर उपस्थित होते.याप्रसंगी सर्वप्रथम प्रमुख मार्गदर्शक लक्ष्मणराव इद्दे सर यांनी विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने गणित व विज्ञानातील कठीण संबोध अगदी हसतखेळत सादर करून दाखविले, विज्ञानाचे प्रयोग सुद्धा सादर केले, यावेळी विद्यार्थ्यांनी भरभरून उत्स्फूर्त
प्रतिसाद देऊन उत्तरे दिली व बक्षिसे सुद्धा विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. तसेच गणित व विज्ञान विषयाची कार्यशाळा घेताना प्राध्यापक महादेवराव खाडे सर यांनी विद्यार्थ्यांना बोलके करून त्यांच्यामध्ये असलेली गणित या विषयाची भीती काढून त्यांना सोपे सोपे उदाहरणे देऊन त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तरे काढून घेऊन त्यांना उत्तरादाखल बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग करून विद्यार्थ्यांना अचंबित करून प्रयोगाचा उलगडा करून दाखविला यामध्ये विज्ञान आहे कुठल्याही प्रकारची जादू किंवा मंत्रतंत्र नाही हे प्रात्यक्षिकातून दाखविले श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून गणित आणि विज्ञान विषयाचे मोलाचे मार्गदर्शन केले .कार्यशाळेचे प्रास्ताविक मधुकर घोडमारे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार रविकांत गोंडलावार सर यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिपाई आकाश बोरूले,प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडपे, कनिष्ठ लिपिक सचिन टोंगे,शिपाई दिलीप कंदस्वार तसेच विद्यार्थी विठ्ठल काळे, नुपूर थेरे, सानिका चामाटे , अक्षरा उपरे, सानिया चांदसूर्य, यांनी सहकार्य केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



कार्यशाळेचे प्रास्ताविक मधुकर घोडमारे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार रविकांत गोंडलावार सर यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिपाई आकाश बोरूले,प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडपे, कनिष्ठ लिपिक सचिन टोंगे,शिपाई दिलीप कंदस्वार तसेच विद्यार्थी विठ्ठल काळे, नुपूर थेरे, सानिका चामाटे , अक्षरा उपरे, सानिया चांदसूर्य, यांनी सहकार्य केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

