वणीच्या नगर पालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता
वणीकर नागरिकांत उत्साह ; वणीचा चेहरा मोहरा बदलण्याची गरज
सुरेंद्र इखारे वणी:- 2025 वणी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज जाहीर झालेल्या निकालात वणी नगर परिषदेवर भाजपच्या विद्या खेमराज आत्राम नगराध्यक्ष पदी निवडून आल्या असून भाजपचे 18 नगरसेवक सुद्धा निवडून आल्याने एकहाती सत्ता भाजपाकडे आली आहे . यामध्ये 6 शिवसेना( उबाठा ) पक्षाचे , 3 काँग्रेस पक्षाचे तर अपक्ष 2 असे एकूण 29 नगरसेवकांची निवड झाली आहे त्यामुळे वणीच्या नगर पालिकेवर आता भाजपाची सत्ता आली असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची अतिषबाजी केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने भाजपचे नगरसेवक रिता महेश पहापळे, वैशाली विनोद वातीले, लक्ष्मण महादेव उरकुडे, अर्चना संजय पुनवटकर, राकेश लक्ष्मण बुग्गेवार, सोनाली प्रशांत निमकर, रितीक लक्ष्मण मामीडवार, उषा डुकरे, नितीन धाबेकर, प्रमिला चौधरी, आरती वांढरे, अनिल चिंडालिया, रेखा कोवे, लवली लाल, पूजा रामगिरवार, मनोज सीडाम, मनीषा गव्हाणे, अर्चना झिलपे यांची निवड झाली तर शिवसेना उबाठा पक्षाचे अजय पांडुरंग धोबे, प्रणाली गणेश देऊळकर, अनिकेत बदखल, सुधीर थेरे, किरण देरकर, गुलाम रसूल रंगरेज यांची निवड झाली आहे तसेच काँग्रेस पक्षामधून करुणा कांबळे, अलका मोवाडे, सैफुर रहेमान व अपक्ष नगरसेवक धनराज रमेश भोंगळे, अब्दुल हाफिज, असे एकूण 29 नगरसेवक निवडणुकीत निवडून आले आहे.
आता भाजपची एक हाती सत्ता असल्याने वणी शहराचा कायापालट होणार असल्याची चर्चा वणीकर नागरिकांत दिसून येत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीनंतर वणी शहरातून फटाक्यांची अतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला ढोलताशांच्या गजरात शहरातील मुख्य व अंतर्गत मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यात अनेक नागरिक सहभागी झाले होते.