कायरच्या विवेकानंद विद्यालयाला उपशिक्षणाधिकारी योगेशजी डाफ यांची आकस्मित भेट
सुरेंद्र इखारे वणी :- वणी तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयाला आज दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी माननीय उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद यवतमाळ योगेशजी डाफ यांनी आकस्मित भेट दिली.
यावेळी उपशिक्षणाधिकारी योगेशजी डाफ यांनी तडकाफडकी मुख्याध्यापक कार्यालयात प्रवेश केला असता येथील शारीरिक शिक्षक सतीश घुले याना मुख्यध्यपकांची विचारणा केली असता मुख्याध्यापक पाठ निरीक्षण व तंबाखूमुक्तीचे संदर्भात तपासणी करीत असल्याचे सांगितले त्यानंतर उपशिक्षणाधिकारी योगेशजी डाफ यांनी वर्ग 8,9 व 10 वि च्या वर्गाची पाहणी करून वर्ग शिक्षकांशी संवाद साधला तसेच ग्रंथालय व प्रयोगशाळा यांची पाहणी करून प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडपे याना शालेय प्रॅक्टिकल चे बाबत विचारणा करून रजिस्टर नोंदीची तपासणी केली तसेच विद्यार्थी सुरक्षा, परिक्षेपे चर्चा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, यु डायस, खातेमान्यता, मंडळ मान्यता ,आर टी इ ची मान्यता व शिक्षक हजेरी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती संदर्भात विचारणा केली असता मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी माहिती दिली.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शालेय युनिफॉर्म व ओळखपत्र घातलेले होते संस्थेचे सचिव तथा शारीरिक शिक्षक सतीश घुले यांनी शालेय इमारत बांधण्याचे आश्वासन दिले . शाळा भेटीत उपशिक्षणाधिकारी योगेशजी डाफ यांनी समाधान व्यक्त केले.