Tuesday, January 13, 2026
Google search engine

लायन्स स्कुल मध्ये *ईपीएफओ द्वारा ‘निधी आपके निकट’   कार्यक्रम संपन्न

 लायन्स स्कुल मध्ये *ईपीएफओ द्वारा ‘निधी आपके निकट’   कार्यक्रम संपन्न

सुरेंद्र इखारे वणी   :-  कर्मचारी भविष्य निधी संघटन, क्षेत्रीय कार्यालय अकोला तर्फे *’निधी आपके निकट’* कार्यक्रमाचे आयोजन, लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल (देशमुखवाडी) वणी, येथे दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० ते सायं.४:०० वाजेपर्यंत करण्यात आले.
यावेळी अकोला येथील क्षेत्रीय कार्यालयाचे प्रवर्तन अधिकारी संतोष पोळ, लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, कामगार कायदे व्यवसायी भालचंद्र चांदे, प्राचार्य प्रशांत गोडे,राॅकवेल मिनरलचे एच.आर.हेड हुसैन बाशा, ई.पी.एस.वणी ता. समन्वय समितीचे अध्यक्ष मारोती मोडक मान्यंवर उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत श्री. संतोष पोळ यांनी कामगार व कर्मचाऱ्यांना,पी.एफ. पेंन्शन व एम्प्लॉईज डिपाॅझिट लिन्क इन्शुरन्स, एम्प्लॉईज एनरोलमेंट स्कीम (२०२५), नियोक्ता व कर्मचारी यांच्या सेवांबद्दल माहिती दिली.
तसेच प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत ( ₹ ९९,४४६ कोटींची तरतूद असलेल्या) कर्मचारी व नियोक्त्यांस २ व ४ वर्ष लाभ, प्रत्येक नवीन कर्मचाऱ्याला त्याचा पहिल्या महिन्याचा पगार रुपये १५००० पर्यंत डि.बी.टी. तसेच प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यामागे नियोक्त्याला रुपये ३००० पर्यंत दर महिना २ किंवा ४ वर्ष डि.बी.टी. व पेंन्शन बाबत सविस्तर माहिती देण्यात येवून पेंन्शनर्स , कामगार व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.
निधी आपके निकट’ उपक्रमाचा लाभ
परिसरातील कामगार व कर्मचाऱ्यांनी घेतला.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular