Tuesday, August 25, 2026
Google search engine

वणी येथे भारत टॅलेंट सर्च परीक्षा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

वणी येथे भारत टॅलेंट सर्च परीक्षा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

सुविचारमाला पुस्तक प्रकाशन ; विद्यमान आमदार संजयभाऊ देरकर यांचे हस्ते

सुरेंद्र इखारे वणी :-    वणी पंचायत समिती अंतर्गत स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल  येथे नुकताच तालुका स्तरीय भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2026 बक्षीस वितरण व सुविचारमाला या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला .

कार्यक्रमाचे उद्घाटक व मुख्य अतिथी  मा.संजयभाऊ देरकर वणी विधानसभा क्षेत्र  हे होते.  अध्यक्षस्थानी स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल च्या प्राचार्या अन्नपूर्णा पवन मॅडम ह्या होत्या.  प्रमुख पाहुणे  गणेश भोयर विस्ताराधिकारी ,  निलेश हेडाऊ  शिक्षण विस्तार अधिकारी, रमेश बोबडे माजी वि.अ. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, केंद्र समन्वयक राहुल तागडे, ईश्वर राऊत,नितीन निवाडे,संदीप ठाकरे, भारत चिव्हाणे,केंद्रप्रमुख गजानन भगत, गटसाधन व्यक्ती अल्का काळे मॅडम, अर्चना चांदपूरकर मॅडम उपस्थित होत्या तसेच राज्य, जिल्हा व केंद्र स्तरावर गुणवत्ता बक्षीस पात्र विद्यार्थी, शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  राज्यात आठव्या वर्गातून तिसरी आलेली आणि इस्रो शैक्षणिक सहलीसाठी पात्र ठरलेली प्लाक्षा पांडे या विद्यार्थिनीचा सत्कार आमदार संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर आशाकला कोवे शिक्षिका जि.प.उ.प्रा.शाळा,वांजरी यांच्या ‘सुविचारामला ‘ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2026 मध्ये जिल्हा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी शर्विल ठाकरे वर्ग 1 ला द्वितीय, श्रीजा धांडे वर्ग 1 ला तृतीय, शिवांश बोबडे वर्ग 5 वा प्रथम,सानिया ढोबे वर्ग 5 वा व्दितीय, शरयू देठे वर्ग 6 वा द्वितीय,सिद्धांत चिखलीकर वर्ग 6 वा द्वितीय, पूर्वी चौधरी वर्ग 6 वा तृतीय, ईश्वरी सुत्रावे वर्ग 7 वा प्रथम, रोमित झाडे वर्ग 7 वा द्वितीय, पलक रामटेके वर्ग 7 वा तृतीय, स्वरा शेडामे वर्ग 8 वा प्रथम, सावी शेंडे वर्ग 8 वा द्वितीय, अथर्व तलांडे वर्ग 8 वा तृतीय यांचा आमदार संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते शिल्ड प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच केंद्रस्तरावर वर्ग 1 ते 8 वी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिल्ड,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशाकला कोवे यांनी केले. प्रास्ताविक समन्वयक विनोद नासरे यांनी केले, भारत टॅलेंट सर्च परीक्षा मार्गदर्शन समन्वयक सुभाष गेडाम यांनी केले.आभार  अनुराधा केळकर यांनी मानले .कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी आकाश खोब्रागडे, मिनाराम तलांडे, प्रवीण झाडे यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular