Tuesday, January 13, 2026
Google search engine

कायर येथील विवेकानंद विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त” लेक वाचवा लेक शिकवा” अभियान 

कायर येथील विवेकानंद विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त” लेक वाचवा लेक शिकवा” अभियान 

सुरेंद्र इखारे वणी :-  तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून “ ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा “ या अभियानाची सुरुवात बँड पथकाचे गजरात सावित्रीबाई फुले व ज्योतीबा फुले यांच्या वेशभूषेत गावातून प्रभातफेरी काढण्यात आलीआहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते, प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव सतीश घुले, जेष्ठ अध्यापक मधुकर घोडमारे, सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार, कु सोनाली भोयर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनावर पूर्वी सोनटक्के, श्रुतिका मडावी, नंदिनी सिडाम, संस्कृती चटपल्लीवर, स्नेहा तुंमवार, चंचल झोडे, दिव्या येसेकर, पल्लवी चीकराम, चैताली ठमके, अनिकेत शेंडे, सुमित शंकवार, रिषभ कोरांगे, खुशबू रागूलवार, राणी जाधव, गौसिया शेख, अस्मिता हंसकार, सपना शेंडे अदिती उरकुडे, अक्षरा उपरे, सानवी चामाटे, वैष्णवी सोनटक्के, आकांशा टेकाम, अक्षरा चिव्हाणे, समीक्षा मेश्राम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोनाली भोयर यांनी केले तसेच जेष्ठ अध्यापक मधुकर घोडमारे व अध्यक्षीय भाषनातून सुरेंद्र इखारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्याची दखल घेऊन लेक वाचवा  लेक शिकवा या अभियाना विषयी माहिती दिली . कार्यक्रमाचे आभार रविकांत गोंडलावार यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मधुकर कोडापे, सचिन टोंगे, दिलीप कांदसवार, आकाश बोरूले, विठ्ठल काळे, नुपूर थेरे यांनी सहकार्य केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular