Monday, January 12, 2026
Google search engine

समाजाचे प्रश्न मांडणारे साहित्यिक निर्माण होणे काळाची गरज :मा. होमेश भुजाडे नागपूर.

समाजाचे प्रश्न मांडणारे साहित्यिक निर्माण होणे काळाची गरज :मा. होमेश भुजाडे नागपूर.
सुरेंद्र इखारे वणी :-   दि. ४जानेवारी:खंडोबा वाघोबा देवस्थान ट्रस्ट वणी, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वणी, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय वणी, धनगर समाज अधिकारी कर्मचारी संघटना वणी, राजमाता अहिल्यामाई होळकर महिला मंच वणीचे संयुक्त विद्धेमाने आयोजित गुणवंत विध्यार्थी सत्कार, प्रबोधन मेळाव्यात बोलताना प्रसिद्ध लेखक, विचारवंत मा. होमेश भुजाडे विध्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करतांना खंडोबा वाघोबा देवस्थान सभागृहात बोलत होते. समाजात असंख्य प्रश्न आहेत, प्रचंड गरिबी, बेरोजगारी आहे त्यावर मात करणेसाठी समाजाने आधुनिक शिक्षणाची कास धरून साहित्य निर्माण करून प्रश्न जगासमोर मांडावेत असे आवाहन उपस्थित समाज बंधू भगिनींना केले. मा. पांडुरंग पंडिले अध्यक्ष खंडोबा वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट वणी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून मा. सुनील पोराटे सचिव धनगर समाज सेवा मंडळ चंद्रपूर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सौ वर्षा भुजाडे, प्रमुख अतिथी म्हणून मा. अशोक सुर अध्यक्ष खरेदी विक्री संघ वणी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. देविदास बोबडे, मा. राजेंद्र कोरडे अध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वणी, मा. सौ प्रतिभा लोंढे अध्यक्ष राजमाता अहिल्यामाई होळकर महिला मंच वणी ह्या उपस्थित होत्या. मा. सुनील पोराटे, मा. देविदास बोबडे, मा. अशोक सुर मा. सौ वर्षा भुजाडे यांनी विध्यार्थ्यांना प्रसंगोचित मार्गदर्शन केले. या सोहळ्यात मा. होमेश भुजाडे सर लिखित महिला सक्षमीकरणाच्या आद्यप्रवर्तक मातोश्री अहिल्याई या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांचे हस्ते झाले. या सोहळ्यात ४५ गुणवंत विध्यार्थी व ११ सेवानिवृत्त समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.३१मे २०२५ रोजी झालेल्या राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्या निमित्त झालेल्या शोभयात्रेत अहिल्यामाई साकारनाऱ्या सौ. भाग्यश्री वैद्य, राजश्री मल्हारराव होळकर साकारणारे मा. धनंजय उरकुडे, महाराजा यशवंतराव होळकर साकारणारे मा. भाऊराव मत्ते यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सुभाष खुजे, मा.गौरव उगे, प्रास्ताविक मा. विलास शेरकी, पाहुण्यांचा परिचय मा. रघुनाथ कांडरकर तर आभार मा. राजेश निरे यांनी केले. या सोहळ्याचे यशस्वीतेसाठी काशिनाथ बुच्चे, डॉ. श्रीकांत भगत, डॉ. मधुकर आस्कर, दिवाकर घोरुडे,राम झिले, राजकुमार बोबडे, संजय चामाटे, विलास गवारकर, सूर्यभान चिडे, श्रीकांत कालर, नितीन वैद्य, काशिनाथ पचकटे, सुरेंद्र बुच्चे, विकास चिडे यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular