Monday, January 12, 2026
Google search engine

कायरच्या विवेकानंद विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

कायरच्या विवेकानंद विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

रमण विज्ञान केंद्र, कोराडी देवीचे दर्शन, दीक्षाभूमी तसेच विविध स्थळांना दिली भेट.

सुरेंद्र इखारे वणी   :-  विवेकानंद विद्यालय कायर शाळेच्या विद्यार्थ्यांनी नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र, कोराडी देवी व दीक्षाभूमी भेट देऊन पाहणी केली व सहलीचा आनंद लुटला.
शैक्षणिक सत्रात गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तू, संग्रहालय किंवा विज्ञान केंद्रास भेट देणे हा एक शैक्षणिक भाग असतो.

विद्यालयातील वर्ग 8,9 व 10 च्या एकूण 38 विद्यार्थी व 4 अध्यापकांची निवड करण्यात आली असे एकूण 42 पर्यटकांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे माध्यमातून पर्यटनस्थळी क्षेत्रभेटीला गेले. या शालेय  सहलीच्या  विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुरेंद्र ईखारे यांनी सहली संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी शैक्षणिक सहली करिता चार  कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये संस्थेचे सचिव तथा शारीरिक शिक्षक सतिश घुले, सहाय्यक शिक्षक रविकांत गोंडलावार, सहायक शिक्षिका सोनाली भोयर, शिपाई आकाश बोरूले आदी उपस्थित होते.

या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी रमण विज्ञान केंद्र ,कोराडी देवी, विमानतळ स्वामी नारायण मंदिर, ड्रॅगन पॅलेस ,महाराजबाग, दिक्षाभूमी, तसेच विविध स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर नागपूर येथून निघाल्या नंतर जाम  जवळ एक हॉटेल मध्ये जेवण देण्यात आले होते.  या  शैक्षणिक सहली करीता  मधुकर घोडमारे, सचिन टोंगे, मधुकर कोडापे, दिलीप कांदसवार,आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular