Friday, May 15, 2026
Google search engine

चिखलगाव येथे मकर संक्रांतीनिमित्त सामुदायिक सूर्यनमस्कार कार्यक्रम संपन्न 

चिखलगाव येथे मकर संक्रांतीनिमित्त सामुदायिक सूर्यनमस्कार कार्यक्रम संपन्न 

सुरेंद्र इखारे वणी    :-  तालुक्यातील चिखलगाव येथील धनोजे कुणबी समाज सभाग्रुहात दिनांक 14 जानेवारी ला सामुदायीक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रामराव गोहोकार कोषाध्यक्ष धनोजे कुणबी समाज समिती चिखलगाव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ईतर योग शिक्षक श्री.लक्ष्मण इद्दे,श्री.सुधाकर गारघाटे,श्री.वसंतराव उपरे,श्री.जयप्रकाश राजुरकर,श्री.प्रकाश नागतूरे,श्री.राजकुमार पाचभाई,श्री.परशराम ढुमणे,सौ.ममता श्रीवास्तव,सौ.वनीता क्षीरसागर,सौ.निता पद्दमवार ई.उपस्थीत होते.
पतंजली ऋषी व जगन्नाथ बाबा च्या प्रतिमेचे पूजन करुन पतंजली ऋषी ची प्रार्थना सामुहिक गायन करण्यात आले.
यावेळी श्री.दिगंबर गोहोकार,श्री.जयप्रकाश राजुरकर यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार 12 मंत्र व 12 क्रीयासह सामुदायिक करुन घेण्यात आले.
यानंतर मार्गदर्शन सभा झाली यात श्री.जयप्रकाश राजुरकर यांनी सूर्यनमस्कार प्रक्रियेतील सात आसने व त्याचे आपल्या शरीरास होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले,श्री.वसंतराव उपरे यांनी सूर्यनमस्कार मधील 12 मंत्र व त्यांचे अर्थ सांगुन आपल्या जीवनात उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले,श्री.लक्ष्मण इद्दे यांनी सूर्यनमस्कार पासुन सप्तचक्र संतुलन याबाबत मार्गदर्शन केले तर श्री.सुधाकर गारघाटे व श्री.प्रकाश नागतूरे यांनी सूर्याचे आपल्या जीवनात उपयुक्तता व सूर्यनमस्कार पासुन आपल्या शरीरासाठी होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दिगंबर गोहोकार यांनी तर आभारप्रदर्शन श्री.परशराम ढुमणे यांनी केले.शेवटी शांतीपाठ, जयघोष व तीळगुळ लाडुचे प्रसाद वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी जगन्नाथ बाबा योग ग्रुप सदाशिवनगर व शंकरबाबा योग चिखलगाव येथील अनेक योग शिक्षक व योग साधक हजर होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.कवडु नागपूरे व श्री.किशोर नागपूरे अणि सर्व योग शिक्षक व योग साधक यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular