Saturday, February 14, 2026
Google search engine

वणी तालुक्यात बारावीचे 1863 विद्यार्थी परीक्षा देणार

वणी तालुक्यात बारावीचे 1863 विद्यार्थी परीक्षा देणार

सुरेंद्र इखारे वणी :-  आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या वणी तालुक्यातून बारावीच्या परीक्षेला 1863 विद्यार्थी आठ केंद्रावर परीक्षा देणार आहे. यामध्ये सहा शहरी तर दोन ग्रामीण केंद्र असणार आहे. या केंद्रावर शासकीय जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय वणी डीसी 55 या परिरक्षण केंद्रातून रणरचे माध्यमातून प्रश्नपत्रिका पोहचविल्या जाणार आहे. या परीक्षेची संपूर्ण जबाबदारी परीक्षेचे परीरक्षक पंचायत समिती वणीचे गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर व सहायक परीरक्षक गणेश निकोले सर हे काम पाहणार आहे.

बारावीची परीक्षा ही कडक बंदोबस्तात व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घेण्यात येणार आहे ही परीक्षा कॉपीमुक्त अभियानांतर्गत निकोप व भयमुक्त वातावरणात घेतली जाणार आहे. या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रावर बैठे पथक, भरारी पथक नेमले असल्याने परीक्षा शांततेत पार पडणार आहे. वणी तालुक्यातील केंद्राक्रमांक 0833 या केंद्रावर 261 विद्यार्थी, 0834 केंद्रावर 250 विद्यार्थी, 835 केंद्रावर 249 विद्यार्थी, 836 केंद्रावर 227 विद्यार्थी, 837 केंद्रावर200 विद्यार्थी, 839 केंद्रावर 195 विद्यार्थी, 840 केंद्रावर 240 विद्यार्थी तर 841 केंद्रावर 241 असे एकूण 1863 विद्यार्थी परीक्षा देणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular