वणीत शांतता समितीची सभा
पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन; सणोत्सवात शांतता राखण्याचे आवाहन
महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त सौ नीलिमाताई काळे यांचा सत्कार
सुरेंद्र इखारे वणी :- येथील पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7.00 वाजता सणोत्सवाचे निमित्ताने शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली.
यासभेच्या सत्कारमूर्ती महाराष्ट्र शासन ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त सौ निलीमाताई काळे यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी दळवी साहेब व ठाणेदार उंबरकर , कपिल पाटील, वाडतकर साहेब यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी होऊ घातलेल्या ईद सणानिमित्त सर्व समाजबांधवांना हा सण शांततेत साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. पुढे रामनवमी हा उत्सव असल्याने सर्व जाती धर्मातील समाजबांधवांनी हा उत्सव एकमेकांचे स्वागत करून आपसात आपुलकी प्रेम एकता कायम ठेवून वणी शहराची शांतता भंग होणार नाही याची सर्व समाजबांधवांनी काळजी घ्यावी असेही एसडीपीओ दळवी साहेब यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांनी सणोत्सवात निर्माण होणाऱ्या समस्यांचा पाढा वाचत मनोगत व्यक्त केले. तसेच समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध राहील असे आश्वासन दिले. सभेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पोलिस ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक शेखर वांढरे यांनी मानले. या सभेला शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा शांतता समितीचे सदस्य सौ निलीमाताई काळे, मंगल तेलंग, राकेश खुराणा, राज्जक पठाण, नईमभाई, नरेंद्र लोणारे, वैजनाथ खडसे, आशिष काळे, कोटावार, साहिदभाई, अरुण खैरे, आदी मान्यवर उपस्थित होते या सभेच्या यशस्वीतेसाठी गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी शेखर वांढरे, सतीश मुजमुळे, संदीप सोयाम, व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला






