वणी येथे माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षक याना व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांची भेट
सुरेंद्र इखारे वणी :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी आयोजित केलेल्या व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता या विषयाचे प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रात दिले जात आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत 2025-2026 या आर्थिक वर्षा करिता व्यवसाय शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या सूचनेनुसार व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता या विषयाचे प्रशिक्षण वणी येथील मार्कंडेय पोद्दार लर्ण स्कुल येथे वणी, मारेगाव व पांढरकवडा या तालुक्यातील वर्ग 9 वि ते 12 वित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळातील मुख्याध्यापक व सहायक शिक्षक याना दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज पहिल्याच दिवशी वणी येथील प्रशिक्षणाला जिल्हाशिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळचे अधिव्याख्याता डॉ भाऊराव राठोड, तसेच स्व मारोतराव पाटील विद्यालय कवठालाचे सहायक शिक्षक किशोर बनारसे यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी विस्ताराधिकारी निलेश हेडावू,समन्वयक विनोद नासरे,संचालक रमेश सूनकुरवार, प्राचार्य अलोने सर, सोनाली चिमोटे,प्रा वटे सर, चाललावार सर, सुलभक प्रा गणेश लोहे देशमुख मॅडम, , सतीश गौरकर, विलास मेश्राम, राठोड सर उपस्थित होते






