Sunday, April 5, 2026
Google search engine

वणी पोलीस ठाण्यात सणोत्सवाचे निमित्ताने शांतता समितीची सभा

वणी पोलीस ठाण्यात सणोत्सवाचे निमित्ताने शांतता समितीची सभा

सुरेंद्र इखारे वणी :- येथील पोलीस ठाण्याच्या प्रांगणात सणोत्सवाचे निमित्ताने शांतता समितीची सभा आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोज मंगळवारला सायंकाळी 7.15 वाजता आयोजित करण्यात आली.

या सभेचे अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी दळवी साहेब हे होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक ठाणेदार उंबरकर साहेब उपस्थित होते. यावेळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार उंबरकर साहेबांनी आता होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती,  ईद, तसेच होळी रंगपंचमी या सणाच्या निमित्ताने सर्व समाजबांधवांनी हा सण शांतते साजरा करावा असे आव्हान करून शांतता समितीच्या सदस्यांनी सहकार्य करावे जेणेकरून सणोत्सवाला गालबोट लागणार नाही याकरिता शांतता समितीच्या सदस्यांनी विचार व्यक्त करून काय करता येईल यासाठी सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी प्रा पुरुषोत्तम पाटील, मंगल तेलंग, मंगला झिलपे, शालिनीताई रासेकर, वंदना आवारी, झाबक, रहीमभाई, अजिंक्य शेंडे, अनुप खत्री, आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यामध्ये प्रामुख्याने वाहतुकीच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला, वणी शहरात चिमुकले शाळकरी विद्यार्थी एम डी, घुटका, यासारख्या मादक पदार्थ्यांच्या व्यसनाधीन झाले असून वणी शहरातील सुमसान ठिकाणी जाऊन व्यसन करतात ,   तसेच भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनावर कार्यवाही करावी अशाही मागणीचा स्वर होता, याकडे वाहतूक विभाग लक्ष देणार काय?असा प्रश्न उपस्थित केला अशी विविध समस्यांवर शांतता समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली.  या शांतता समितीच्या सभेचे सूत्रसंचालन पोलीस ठाणेदार गोपाल उंबरकर साहेबांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक शेखर वांढरे यांनी मानले यावेळी सभेला शांतता समितीचे सदस्य, व्यापारी, पत्रकार व विविध पक्षाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. या सभेच्या यशस्वीतेसाठी पोलीस विभागाचे सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular