विदर्भ कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षांची वणीत धावती भेट
सुरेंद्र इखारे वणी :- येथे मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार पुरस्कृत “ माजी आमदार केसरी दंगल कुस्ती” स्पर्धेच्या संदर्भात वणी येथे विदर्भ कुस्तीगीर संघाचे अध्यक्षांची धावती भेट.
माजी आमदार केसरी दंगल कुस्तीचे प्रमुख मार्गदर्शक व आयोजक कुस्तीप्रेमी पांडुरंगजी लांजेवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकामध्ये विदर्भ कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष गणेशजी कोहळे व अन्य सदस्य पहेलवान यांची भेट घेऊन पुष्पगुच्छानी स्वागत केले. यावेळी पांडुरंगजी लांजेवार, मोरेश्वर बोण्डे , इरफान शेख, संजय शिवरात्रीवार, श्रीकांत मेश्राम, सुरेंद्र इखारे उपस्थित होते.





