वणी येथे पोलीस प्रशासन विभाग व महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
सुरेंद्र इखारे वणी :- पोलीस प्रशासन वणी विभाग व महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशन वणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसांचा कार्यक्रम विविध उपक्रमाने यशस्वीपणे संपन्न झाला.यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.सुरेश दळवे उपविभागीय पोलिस अधिकारी तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.भानुदास पिदुरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यासोबतच श्री.भिकाजी भोयर,श्री.पांडुरंग देठे,श्री.उदयराव गोहोकार,श्री.सुधाकरराव गारघाटे, श्री.सतीश पिंपळे,श्री.रामजी महाकुलकार,श्री.पुंडलीक जोगी,श्री.निरंजन खाडे,श्री.यादव देऊळकर,श्री.विनोद ताजणे इ.उपस्थित होते.
यावेळी महर्षी पतंजली ऋषी च्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.श्री.विजयराव गंधेवार यांनी योगगीत गायन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून योग दिवसाचे महत्त्व व महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे कार्याबाबत माहिती श्री.लक्षमण इद्दे राज्य उपाध्यक्ष यांनी तर आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रशिक्षीत योग शिक्षक श्री.दिगंबर गोहोकार जिल्हा उपाध्यक्ष व श्री.जयप्रकाश राजुरकर तालुका सचिव यांनी प्रोटोकॉल नुसार योग कार्यक्रमाचे संचलन केले तसेच आदर्श प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी मंचावर आयुष मंत्रालय भारत सरकार चे प्रशिक्षीत योग शिक्षक श्री.वसंतराव उपरे,श्री.हरीभाऊ दळवे,सौ.वनिता क्षिरसागर व सौ.निता श्रीपदमावार इ.उपस्थित होते.
यावेळी सूर्यनमस्कारासह विविध आसने व प्राणायामाचा समावेश असलेले देशभक्तीपर गीतांवर आधारीत शंकरबाबा देवस्थान मंदीर चिखलगाव च्या सौ.निता श्रीपदमावार व जगन्नाथ बाबा योग ग्रुप शेतकरीनगर चिखलगाव च्या सौ.ममता श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली योग साधक महिलांनी आकर्षक व मनोवेधक योगन्रुत्य सादर केले.या कार्यक्रमासाठी जगन्नाथ बाबा योग ग्रुप व शंकर बाबा योग ग्रुप चिखलगाव,इच्छाशक्ती योग ग्रुप वणी, जेष्ठ नागरिक मंडळ चिखलगाव व गणेशपूर, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी योग ग्रुप चे सदस्य व हॅपी थाॅट्स परिवार अंतर्गत ज्ञान-ध्यान केंद्र नांदेपेरा रोड व जत्रा रोड वणी येथील सदस्य सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री.नानाजी विधाते यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.शुभम महानवर पोलीस उपनिरीक्षक यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.रामराव गोहोकार,श्री.अरुण झाडे,व.श्री.सुरेश रायपूरे,श्री.संजय पोटदुखे,श्री.अशोक पारखी,श्री.तानाजी पाऊनकर,श्री.बळीराम पूसनाके,श्री.मधूकर पूसदेकर,श्री.सारनाथ सोनटक्के, सतीश मुजमुले व शाम राठोड व इतर महिला योग साधक सौ.रेखा उपरे, सौ.माधुरी ढवळे,सौ.विणा गोहोकार,सौ.लता पारखी,सौ.स्मीता दर्वे,सौ.श्रदधा चिडे,सौ.रजनी मोरे,सौ.रजनी बल्की,सौ.कमल पोटदुखे,सौ.प्रियंका देठे यांनी सहकार्य केले





