कायरच्या विवेकानंद विद्यालयाला उपशिक्षणाधिकारी वंदना नाईक यांची आकस्मित भेट
सुरेंद्र इखारे वणी :– तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयाला आज दिनांक 7 जुलै 2026 रोजी उपशिक्षणाधिकारी( माध्यमिक) जिल्हा परिषद यवतमाळ वंदना नाईक व विस्ताराधिकारी स्मिता घावडे यांनी आकस्मित भेट दिली.
यावेळी विद्यालयात प्रवेश करून त्यांनी मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे याना आधी वर्गाची पाहणी करू असे त्यांनी म्हटले व वर्ग 9 व वर्ग10 व्या वर्गातील मुलांशी संवाद साधून त्यांना वेळेच्या नियोजनाचे महत्व समजावून सांगितले तसेच गणित व इतिहास या विषया संदर्भात संवाद साधून विद्यार्थ्यांकडून उत्तरे काढून घेतली. तसेच शालेय दस्तऐवज शिक्षक हजेरीबुक, विद्यार्थी हजेरी, सखी सावित्री, विद्यार्थी सुरक्षा, तक्रारपेटी, बाहेर गावावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंद ठेवणे ,ऑटो चालकाचे परवाना व वाहनाचे कागदपत्रा चे जतन करणे, प्रयोगशाळेची पाहणी केली, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती या सर्व बाबींची माहिती घेतली शाळा तपासणीत विद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावण्यास सांगितले .उपशिक्षणाधिकारी वंदना नाईक व विस्ताराधिकारी स्मिता धावडे यांनी शालेय व्यवस्थापन व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. या भेटीमुळे शालेय व्यवस्थापनात सकारात्मक सुधारणा व पुढील विकासासाठी मार्ग प्रशस्त झाला.यावेळी शालेय कर्मचारी सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, सोनाली ठाकूर, कनिष्ठ लिपिक सचिन टोंगे, मधुकर कोडापे, उपस्थित होते.
कायरच्या विवेकानंद विद्यालयाला उपशिक्षणाधिकारी वंदना नाईक यांची आकस्मित भेट




