Wednesday, July 29, 2026
Google search engine

वणीत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुरुजनांचा सत्कार 

वणीत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुरुजनांचा सत्कार 

गुरुशिष्य परंपरा जोपासत गुरुजनांप्रती भाजपने व्यक्त केली कृतज्ञता  

सुरेंद्र इखारे वणी,   :-   भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पवित्र दिवशी गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. या परंपरेचे जतन करत भारतीय जनता पार्टी, वणी शहर मंडळाच्या  वतीने आज दिनांक २९ जुलै २०२६ रोजी वणी शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातील विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड, धार्मिक क्षेत्रातील हरिभक्त पारायण मुन्ना महाराज तुगनायत, शैक्षणिक क्षेत्रातील गजानन कासावार सर, सामाजिक क्षेत्रातील निवृत्त शिक्षक बोधे सर, आरोग्य क्षेत्रातील डॉ. सपाट सर तसेच क्रीडा क्षेत्रातील राजू डवरे सर यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष सौ. विद्या आत्राम, उपाध्यक्ष श्री राकेश बुग्गेवार, भारतीय जनता पार्टी वणी शहर अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक श्री दीपक पाऊणकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री अंकुश बोढे, मंडल सरचिटणीस तथा नगरसेवक श्री लक्ष्मण उरकुडे, नगरसेवक श्री अनिल चिंडालिया, मंडल सरचिटणीस तथा कार्यक्रम समन्वयक श्री हितेन अटारा, मंडल उपाध्यक्ष श्री मनोज सरमुकदम, श्री रोहित वनकर सर, श्री राजेंद्र साखरकर सर, श्री गणेश आसूटकर सर, सौ. भारती बदखल, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. नीता पिदुरकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्री बालाजी भेदोडकर, श्री श्रेयस हरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समाजाला दिशा देणाऱ्या विविध क्षेत्रातील गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. भारतीय जनता पार्टी, वणी शहर मंडलाच्या या उपक्रमातून गुरुजनांविषयीचा आदर, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular