कायरच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक 03/8/2026 रोज सोमवारला कायर केंद्राची जुलै महिन्याची शिक्षण परिषद संपन्न झाली .
या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निलोफर पठाण ह्या होत्या. प्रमुख पाहुणे माजी शिक्षण विस्तार अधिकारी सत्कार मूर्ती श्री रमेश बोबडे सर , कायर केंद्राचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री गणेश भोयर तसेच माजी सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री शेख सर होते.तसेच शाळा व्य. समिती उपाध्यक्ष सौ मंथनवार व मुख्याध्यापक श्री राजेश खुसपुरे सर होते . या सर्वाचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .संमेलनाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री गजानन भगत यानी केले तर श्री किशोर कोटी सर यांनी जयंत नारळीकर गणित- विज्ञान व खान अकादमी यावर तर विनोबा अँपबाबत श्री प्रकाश तालावर सर यांनी मार्गदर्शन केले .विविध शैक्षणिक उपक्रम व प्रशासकीय बाबीचा आढावा घेण्यात आला .केंद्रातील सर्व शिक्षक , खाजगी अनुदानित व स्वयं अर्थ सहायित शाळेतील शिक्षक , अंशकालीन निर्देशक यांनी हजर राहून मोलाचे सहकार्य केले व शिक्षण परिषद यशस्वी केली . केंद्रातील सर्व शिक्षक, येथील विद्यार्थी व केंद्रातील शिक्षकाचा उत्स्फूर्त सहभाग होता. सूत्रसंचालन श्री अमर मडावी यांनी केले. तर आभार श्री राजेश खुसपुरे यांनी मानले.





