Tuesday, August 18, 2026
Google search engine

कायरच्या विद्यालयात “वंदे मातरम” राष्ट्रीय गीताचे 150 वर्षाचे स्मरण

कायरच्या विद्यालयात “वंदे मातरम” राष्ट्रीय गीताचे 150 वर्षाचे स्मरण
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात  शासनाचे परिपत्रकानुसार  9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत “हर घर तिरंगा” या उपक्रमाचे अनुषंगाने  दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोज सोमवारला “वंदे मातरम”या राष्ट्रीय गीतास 150 वर्ष पूर्ण होत असल्याने उपक्रमाचा शेवट “ वंदे मातरमच्या 150 वर्षाचे स्मरण दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते, प्रमुख उपस्थिती सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार, सहायक शिक्षिका सोनाली ठाकूर , शाळा नायक कु सानिका चांदसूर्य उपस्थित होत्या.
युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन करण्याचा सन्मान विविध स्पर्धात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकांत गोंडलावार यांनी केले . यानंतर उपस्थित मान्यवरांचे हस्ते विद्यार्थिनींना वत्कृत्व स्पर्धा प्रमाणपत्र, अंध निधी प्रमाणपत्र, ग्रामगीता स्पर्धा परीक्षेचे प्रमाणपत्र, अशा विविध स्पर्धांच्या प्रमाणपत्राचे वितरण कु सानिका चांदसूर्य, कु चंचल झोडे, तनवी चंदनवार, शारदा चव्हाण, स्नेहा तूम्मवार, पल्लवी चीकराम, सेजल पारखी, वैष्णवी निमसटकर, चैताली ठमके, श्रीस्ता गुरनुले,हंसिका ठाकूर, मेघा धोबे, आचल चिकणकर, समीक्षा गेडाम, मैथिली उदे, नंदिनी सीडाम, संस्कृती चेतपल्लीवार, श्रुतिका मडावी, अफक पठाण, स्नेहा निकुरे, खुशबू रागुलवार, यांना करून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी अध्यक्षीय भाषणातून त्यांनी सर्वप्रथम सर्व सन्मानित विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व वंदे मातरमच्या 150 वर्षाचे स्मरण अधोरेखित करताना म्हणाले वंदे मातरम ही फक्त कविता नाही तर जागरणाचा शंखनाद आहे. त्यात भारतीयांची भक्ती, वेदना, श्वास, प्रेम, क्रांतीचा जयघोष होता असे प्रतिपादन केले. पुढे म्हणाले वंदे मातरम भारत देशाचे धडधडत ह्रदय आहे . तेव्हा मातृभूमीच्या सेवेसाठी आणि सन्मानासाठी झटले पाहिजे हाच खरा या मंत्राचा संदेश आहे . असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शिपाई आकाश बोरूले, लिपिक सचिन टोंगे,व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular