Friday, September 18, 2026
Google search engine

कायरच्या विद्यालयात”सेवा संकल्प अभियान”उत्साहात

कायरच्या विद्यालयात”सेवा संकल्प अभियान”उत्साहात

देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला “संकल्प”

सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन परिपत्रकानुसार 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत शालेय विविध उपक्रम तसेच देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी केला विविध उपक्रमात सहभागी होण्याचा संकल्प .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. उपस्थित जेष्ठ विज्ञान शिक्षक मधुकर घोडमारे, सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार, गणित शिक्षिका सोनाली ठाकूर ह्या होत्या. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक मधुकर घोडमारे यांनी सेवा संकल्प अभियान हे शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार असे सांगितले. सोनाली ठाकूर यांनी विकसित भारत संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, नमो सेवागाथा, तसेच करिअर मार्गदर्शन अशा विविध उपक्रमाचा समावेश आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा सोबतच विविध उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होणारी वर्ग 10 वी ची विद्यार्थिनी कु सानिका चांदसूर्य हिचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी अध्यक्षस्थानावरून विचार व्यक्त करताना म्हणाले आपल्या देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला आज 25 वर्ष पूर्ण झाल्याने राज्यात “सेवा संकल्प अभियान “ राबविण्याचा निर्णय व त्यांच्या 76 व्या वाढदिवसानिमिताने “ विकसित भारत 2047 “ चे स्वप्न साकार करण्यासाठी या उपक्रमांचे माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव निर्माण होऊन जबाबदार नागरिकत्वाची जाणीव व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत गोंडलावार यांनी केले तर आभार कु सानिका चांदसूर्य हिने मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी कनिष्ठ लिपिक सचिन टोंगे, प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडापे, शिपाई आकाश बोरूले, विद्यार्थी सुमित शंकावार, दुर्वास पळकँटीवार, जोगी, यांनी सहकार्य केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular