Saturday, October 3, 2026
Google search engine

लायन्स इं. मिडी. स्कूलच्या मुलींचा संघ  विभागीय क्रिकेटच्या मैदानावर

 लायन्स इं. मिडी. स्कूलच्या मुलींचा संघ  विभागीय क्रिकेटच्या मैदानावर

*अंतिम सामन्यात कर्णधार स्वरा करंडे, भाविका हेपट व अंजली पांडे  यांची  उल्लेखनीय  कामगिरी*

सुरेंद्र इखारे वणी :-  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (महा. राज्य) यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वणीच्या संघाने दमदार कामगिरी करत जिल्हा विजेतेपद पटकावले आहे.

दिनांक २ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील राणी झाशी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात लायन्स स्कूलच्या मुलींच्या संघाने  राणी लक्ष्मीबाई विद्यालय, यवतमाळ संघाचा ९ विकेट्सने पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. या विजयासह लायन्स स्कूल, वणीचा संघ अमरावती विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

अंतिम सामन्यात कर्णधार स्वरा करंडे, भाविका हेपट व अंजली पांडे  यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली.

या जिल्हा विजेत्या संघात कर्णधार स्वरा करंडे, भाविका हेपट, अंजली पांडे, मानवी कटारिया, कोमल राजपुरोहित, अनोखी केमेकर, श्रावणी काळे, संबोधी वानखेडे, आराध्या येवले, हर्षदा नित, कंचन गुरनुले, अनुश्री चंद्रगिरीवार, अनन्या राजुलवार, ईशानी हेपट, कुमूद नित व मृणाली गोवारदिपे यांचा समावेश होता.

लायन्स स्कूलचा संघ  दुसऱ्यांदा विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, संचालक शमीम अहमद, नरेंद्र बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला* तसेच अकॅडेमिक डायरेक्टर  प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, सुनिता खुसपुरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी क्रीडा प्रशिक्षक  अविनाश ऊईके व शिक्षिका नेहा शेख आणि विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले व अमरावती येथील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular