भालर शाळेच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरावर धडक
सुरेंद्र इखारे वणी :- तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत तुकडोजी महाराज विदयालय भालर शाळेतील मुलांची जिल्हास्तरावर धडक
विद्यालयाचे मार्गदर्शक शारीरिक शिक्षक लक्ष्मण ढेंगळे सर यांच्या मार्गदर्शनात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत 14 वर्षाआतील लांब उडीच्या स्पर्धेत मुलींमधुन लावण्या संदिप वरारकर प्रथम व लांबउडी 17 वर्षाआतील स्पर्धेत मुलींमधुन भावना संदिप खोके प्रथम आली तसेच 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 17 वर्षाआतील मुलींमधुन कु.रितीका राजू टिकले व्दितीय तसेच लांबउडी 14 वर्षाआतील मुलांमधुन अनिकेत विनोद बोंडे हा मुलगा व्दितीय आला तसेच जय बोढें हयांनी सुध्दा 17 वर्षाआतील स्पर्धेत तीसरा क्रमांक मिळउन उल्लेखनिय कामगीरी केली आता जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी या मुलांना दिनांक 5 आक्टोंबरला यवतमाळ येथे जायचे आहे.सदर मुलांना मिळालेल्या यशाबदल शिक्षण संस्थेचे सचिव मा.सुनिलभाउ वरारकर यांनी मुलांचे आभनंदन केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनोज वरारकर यांनी व शिक्षक श्री.अविनाश वरपटकर,श्री.बंडू अडाले श्री.नथ्थु जेउरकर,श्री.तुकाराम ढेंगळे,भाश्कर हेपट,सुरेश हेपट बंडू धोंगडे तसेच पालक वरर्गातुन कौतुक होत आहे.




