Monday, October 5, 2026
Google search engine

वणी येथे तालुकास्तरीय पथनाट्याचा समारोप

 वणी येथे तालुकास्तरीय पथनाट्याचा समारोप

एक उत्कृष्ठ कलावंत  व  परीक्षक गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका  सौ.सिमा सोनटक्के मॅडम  सन्मानित

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातुन शासनाच्या विविध योजनांची जनजागृती

सुरेंद्र इखारे वणी   – येथील पंचायत समिती , समग्र शिक्षा अभियान शिक्षण विभागाचे वतीने  एस पी एम विद्यालयात  सेवा संकल्प  अभियानांतर्गत  नागरिकाभिमुख विविध सेवा,  केंद्रशासन व राज्यशासनाच्या जनकल्याण योजनांची माहिती होण्याच्या दृष्टीने तालुक्यातील विविध शाळांनी  सहभागी होऊन  आज दिनांक 5 ऑक्टोबर2026 रोजी तालुकास्तरीय पथनाट्य उपक्रमाचा समारोप झाला .

यावेळी तालुकास्तरीय पथनाट्याचे आयोजक  तथा मार्गदर्शक आदरणीय गटशिक्षणाधिकारी  स्नेहदिप काटकर साहेब ,पंचायत समिती वणी,    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  सौ कुमुदिनी देवतळे मॅडम,केंद्रसमन्वयक, प्रमुख पाहुणे एस पी एम विद्यालय वणी चे प्राचार्य आदरणीय क्षिरसागर सर , शोभने  सर तसेच परीक्षक सौ. सिमा सोनटक्के मॅडम उपस्थित होत्या.

याप्रसंगी कार्यक्रमाला सदिच्छा भेट  गणेश  भोयर सर शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती,वणी तसेच नितीन मोवाडे केंद्रसमन्वयक  यांनी दिली असता . उपस्थितीत मान्यवरांचे हस्ते तालुक्यातील एक उत्कृष्ठ कलावंत म्हणुन गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका  सौ.सिमा सोनटक्के मॅडम यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तालुकास्तरीय पथनाट्याचे परीक्षण सौ.सिमा सोनटक्के मॅडम यांनी केले  या  पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक गुरुपीठ इंग्लिश मिडीयम स्कुल, वणी द्वितीय क्रमांक -जि.प.व.प्राथ.शाळा, मानकी तृतीय क्रमांक – लाॅयन्स इंग्लिश मिडीयम स्कुल वणी यांनी  पटकावला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.अल्का काळे विषयसाधनव्यक्ती यांनी केले . सूत्रसंचालन सौ. सपना वासेकर विषय शिक्षक यांनी केले तर आभार   कु.निशा चौधरी , विषयसाधनव्यक्ती यांनी मानले

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बिआरसी कर्मचारी कु.धनलक्क्ष्मी लक्षट्टीवार तसेच एस पी, एम विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे  सहकार्य मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular