Friday, October 16, 2026
Google search engine

*वणी येथे १८ ऑक्टोबरला एकदिवसीय ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन*

*वणी येथे १८ ऑक्टोबरला एकदिवसीय ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन*

*मास्टर चेस ॲकॅडमी व शिक्षक मित्र फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळा*

सुरेंद्र इखारे वणी,  : मास्टर चेस ॲकॅडमी व शिक्षक मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी एकदिवसीय ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शेतकरी मंदिर लॉन, वणी येथे सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

बुद्धिबळ खेळाला प्रोत्साहन देणे, खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच बुद्धिबळ खेळाचा प्रसार करणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

*या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाला मा. नरेंद्र मिलमिले सर, मा. संजयभाऊ खाडे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, विद्याताई आत्राम नगराध्यक्ष, नगर परिषद, वणी. किरणभाऊ दिकुंडवार प्रोप्रायटर, विजया इंप्रोस्ट्रक्चर. रिताताई पहापळे सभापती, महिला व बालकल्याण नगर परिषद,वणी. प्रमोदभाऊ निकुरे अध्यक्ष, शिवाजी व्यायाम शाळा वणी.पोर्णिमाताई शिरभाते, समाजसेविका, रवि चांदणे सर अध्यक्ष,शिक्षक मित्र फाउंडेशन वणी, भारत गारघाटे, माजी अध्यक्ष, यवतमाळ शालेय कर्मचारी पतसंस्था ,रवि साळवे मुख्याध्यापक दामोदर पंत कन्या विद्यालय,मारेगाव व सौ. अल्का साळवे मॅडम उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी पतसंस्था यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.*

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मास्टर चेस ॲकॅडमीचे संचालक मारोती कोंडागुर्ले, शिक्षक मित्र फाउंडेशन चे अध्यक्ष रवि चांदणे सर तसेच सन्मित्र युवा क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.

बुद्धिबळप्रेमी, खेळाडू व क्रीडारसिकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular