Saturday, May 16, 2026
Google search engine

वणी प्रक्षेत्र खाजगी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या  निवडणुकीत ” परिवर्तन पॅनलचा” प्रभाव

वणी प्रक्षेत्र खाजगी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या  निवडणुकीत  “परिवर्तन पॅनलचा” प्रभाव

क्रियाशील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हिताचे परिवर्तन पॅनल

सुरेंद्र इखारे वणी –  तालुक्यातील वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनल प्राचार्य सुधीर वटे, श्याम बोढे सर, दिवाकर नरुले सर व शैलेश नांदेकर यांचे नेतृत्वात लढविली जात आहे सर्वसाधारण गटातून चेतन गोवरदीपे , राहुल ठेंगणे, किशोर बोढे, दत्तू महाकुलकर, गणेश लोहे, घनश्याम पावडे, महिला संवर्गातून कु वंदना शंभरकर, सौ सीमा सोनटक्के अनु जाती संजय मडावी भटक्या विमुक्त जमाती मधून सुरेंद्र इखारे तर इमाव मधून संतोष बेलेकार हे “विमान” चिन्हावर प्रभावशाली उमेदवार असल्याने निवडणुक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

वणी प्रक्षेत्रावर मागील 15-20 वर्षापासून अविरोधाच्या नावाखाली वर्चस्व गाजवत आहे. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन पॅनलची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पतसंस्थेचे निवडणुकीत  सध्या परिवर्तन पॅनलच्या  उमेदवारांचा बोलबाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पतसंस्थेचे मतदार बंधू भगिनी   विजय पताका फडकवणार असा अंदाज आहे. कारण क्रियाशील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे परिवर्तन पॅनल असल्याने आता मतदारांवरच परिवर्तन पॅनलची भिस्त असल्याने मतदारांपुढे मोठे आव्हान आहे. परंतु मागील पंचवार्षिकची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी परिवर्तन पॅनलला मतदान केलं पाहिजे तरच परिवर्तन पॅनेलने केलेले आवाहन शाबूत राहील.  या निवडणुकीत सर्व अकरा ही उमेदवार “विमान “ या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार अटीतटीची आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular