Saturday, May 16, 2026
Google search engine

वणी प्रक्षेत्राच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी    

वणी प्रक्षेत्राच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी    

सुरेंद्र इखारे वणी – वणी तालुक्यातील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची असणारी वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे प्राचार्य सुधीर वटे सर, श्याम बोढे सर, दिवाकर नरुले सर व शैलेश नांदेकर सर यांचे नेतृत्वात परिवर्तन पॅनलच्या संचालक उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे.

वणी तालुक्यातील वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर सभासदांची भेट घेऊन डबघाईस आलेल्या पतसंस्थेचा आपण विकास कसा करणार हे मतदारांना ते समजावून सांगत आहे. त्यामुळे मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे परिवर्तन पॅनेलने मुसंडी मारून प्रचारात आघाडी मिळविली आहे .     वणी प्रक्षेत्राच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या अकरा उमेदवारांनी उमेदवारी दाखल करून परिवर्तनाचे दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असल्याने शिक्षक – शिक्षकेत्तर सभासदांसाठी तत्परतेने धावून जातात त्यामुळे  परिवर्तन पॅनलच्या उमेदवार संचालकांची समाजात चांगली प्रतिमा असल्यामुळे  मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संचालकपदासाठी उमेदवार म्हणून सर्वसाधारण प्रवर्गातून चेतन गोवारदिपे , राहुल ठेंगणे, किशोर बोढे, दत्तू महाकुलकर, घनश्याम पावडे, गणेश लोहे, अनु जाती जमाती संजय मडावी, भटक्या जमाती सुरेंद्र इखारे , इमाव प्रवर्गातून संतोष बेलेकार ,महिला प्रतिनिधी कु वंदना शंभरकर, सौ  सीमा सोनटक्के, या उमेदवारांची प्रतिमा स्वच्छ आणि तळमळीने काम करण्याची वृत्ती असल्याने मतदारांचा कल परिवर्तन पॅनलच्या बाजूने असल्याचे  दिसून येत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular