Monday, April 20, 2026
Google search engine

वणी येथील जी. प. माध्यमिकचे मुख्याध्यापक मुझफ्फर ए खान राज्य पुरस्काराने सन्मानित

वणी येथील जी. प. माध्यमिकचे मुख्याध्यापक मुझफ्फर ए खान राज्य पुरस्काराने सन्मानित  

सुरेंद्र इखारे वणी  :- जिल्हा परिषद (माजी शास.) माध्य. व उच्च माध्यमिक शाळा चे प्र.मुख्याध्यापक तथाप्राचार्य  मुझफ्फर अली खान यांना दिनांक २१/९/२०२५ रोजी मौ.आझाद उर्दू क.म.वि. गांधी बाग नागपूर येथे उफक एजुकेशन व वेल्फेयर सोसायटी कामठी, नागपूर च्या वतीने राज्य आदर्श पुरस्काराने संम्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार पूर्व विधान परिषद सदस्य महारष्ट्र राज्य श्री एस क्यू. झमा, कृष्णा विश्वविद्यापीठ कराड चे सल्लागार व प्रसिद्ध वक्ता श्री वेदप्रकाश मिश्रा, बोर्ड ऑफ स्टडीज संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर चे माजी अध्यक्ष डॉ.मोहम्मद अझहर हयात, नागपूर हायकोर्ट चे सीनियर अॅडव्होकेट श्री मिर्झा फिरदोस बेग व एम ए आझाद उर्दू माध्य व उच्च माध्य शाळा ची माजी मुख्याध्यापिका श्रीमती डॉ. फरझाना हुसैन ह्या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे. यामुळे वणी शहरातील अनेक पालक, माजी विद्यार्थी, जिल्हा परिषद हायस्कूल वणी चे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व अनेक मित्रमंडळींनी श्री मुझफ्फर सरांचे अभिनंदन व कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे .

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular