Friday, May 15, 2026
Google search engine

लोहार समाजाची विश्वकर्मा जयंती हर्षोल्लासात साजरी

लोहार समाजाची विश्वकर्मा जयंती हर्षोल्लासात साजरी
सुरेंद्र इखारे वणी :- 
तिरूपती मंगल कार्यालय वणी येथे लोहार समाजाचे वतिने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली यावेळी समाजातील महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते
येथील लोहार समाज संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रभु श्री विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली सर्व प्रथम समाजातील मान्यवर मंचावर स्थानापंन्न झाल्यावर प्रभु श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर महिला आघाडीअध्यक्षा छाया निंदेकर व महिला सदस्यांनी आरती केली त्या नंतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर बाबारावजी चट्टे,विठ्ठलराव सोनटक्के, कॅप्टन महादेवराव गाताडे, भास्करराव बागळे, महादेवराव कांबळे रमेशराव झिंगरे मधुकरराव सोनटक्के हे उपस्थित होते याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक नितीन धाबेकर यांचा संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
त्या नंतर चिमुकल्यांचा बहारदार नृत्याचा कार्यक्रम सादर केला गेला प्रत्येकाला चषके देऊन गौरविण्यात आले  समाजबांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शिरीष क्षीरसागर यांनी केले तर आभार  नितीन धाबेकर यांनी मानले   कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी  संघटनेचे मुख्य सल्लागार बंडू निंदेकर,अध्यक्ष नितीन धाबेकर सचिव शिरीष क्षीरसागर,राहुल चट्टे,रवी गाताडे,प्रशांत सोनटक्के,संतोष सावरकर,संदिप वाघाडे,आकाश खंडाळकर,पवन खंडाळकर,निलेश सोनटक्के,अजय सोनवणे, महिला अध्यक्षा छाया निंदेकर,किर्ती सुर्तिकर,शितल गाताडे,अमृता चट्टे व इतरही सदस्यांनी मोलाचे योगदान दिले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular