Monday, September 21, 2026
Google search engine

कायरच्या विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी कु सानिका चांदसूर्य वक्तृत्व स्पर्धेत तृतीय

कायरच्या विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी कु सानिका चांदसूर्य वक्तृत्व स्पर्धेत तृतीय

सुरेंद्र इखारे वणी :-   येथील संस्कार भारती समिती, सागरझेप बहुउद्देशीय संस्था व जैताई देवस्थान यांचे संयुक्त विद्यमाने स्व श्री माधवराव सरपटवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 18 जानेवारी 2026 रोजी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विवेकानंद विद्यालय कायर ची विद्यार्थिनी कु सानिका मनोहर चांदसूर्य हिने “थोर पुरुषांचे विचार- काळाची गरज” या विषयावर विचार व्यक्त करून तिने “अ “ गटातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

जैताई देवस्थान वणी येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी स्व श्री माधवराव सरपटवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित भारत माता पूजन व्याख्यानमालेतील “ राष्ट्रासाठी महात्मा फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य” या विषयाचे वक्ते प्राचार्य डॉ दिलीप चौधरी यांचे हस्ते कु सानिका मनोहर चांदसूर्य हिला वक्तृत्व स्पर्धेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

यावेळी श्रीरामकृष्ण शिक्षण संस्था वणी द्वारा संचालित विवेकानंद विद्यालय कायर या संस्थेचे अध्यक्ष मा श्री जयंतराव चौहान , उपाध्यक्ष ग. कृ. टोंगे, सचिव स. वि. घुले,संचालक रा .पो. गोंडलावार, रा. आ. चौहान, ग. ल. मांडवकर, दिलीप भ. मालेकार, म. भ. टिकनायत, अविनाश ठावरी, मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे, सहा शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, सोनाली भोयर, शिक्षकेत्तर कर्मचारी सचिन टोंगे, मधुकर कोडापे, दिलीप कांदसवार, आकाश बोरूले व समस्त गावकऱ्यांनी कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular