यंदा वणीची शान असलेल्या गुद्दलपेंडीचा खेळ पूर्ववत
वणीच्या जत्रा मैदान सवारी बंगल्याजवळ धुलीवंदनाच्या रात्री रंगणार खेळ
सुरेंद्र इखारे वणी- यंदा वणीची आगळीवेगळी शान असलेली गुद्दलपेंडी चा खेळ हा होळी सणाच्या पर्वावर खेळला जातो म्हणजे धुलीवंदनाच्या रात्री रंगणारा खेळ आहे. विदर्भात वणी शहराची ओळख करून देणारा खेळ म्हणजे गुद्दलपेंडी या खेळाने वणी शहराला ओळख दिली आहे. या गुद्दलपेंडी खेळाला शे- दोनशे वर्षाची परंपरा लाभली आहे. आणि हा गुद्दलपेंडी चा खेळ वणी शहरात खेळल्या जातो.हा खेळ खुल्या मैदानामध्ये दोन खांबांना एक जाड दोर म्हणजे नाडा बांधला जातो . दोरी (नाडा) च्या दोन्ही बाजूनी 15 ते 20 मल्ल एका हाताने दोरीला पकडून उभे असतात आणि गुद्दलपेंडी सुरू होण्याचा इशारा होताच दोरीच्या दोन्ही बाजूकडील मल्ल आपापल्यासमोर असणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला कमरेच्यावर ठोसा (मुक्का )लगावणे सुरू करतात. हा प्रकार इतका भयंकर असतो की क्षणभर आपण हदरतो. पण तिथले दोन्ही प्रतिस्पर्धी मात्र एकमेकांवर ठोश्या ने प्रहार करतात या प्रकारात अनेक मल्लांच्या नाका-तोंडातून रक्त येऊन जखमी होतात परंतु या जखमीं मल्लांना काळ्या दगडाच्या मूर्तीच्या समोर टाकण्यात येते व शुद्धीवर आल्यावर काहीवेळाने पुन्हा उठून खेळायला लागतो म्हणजेच या खेळामध्ये ठोसा मारून मनगटाच्या जोरावर हा खेळ खेळाला जातो या खेळाला गुद्दलपेंडी असे म्हणतात अशी आख्यायिका आहे . हा खेळ वणी वासीयांकरिता वेगळा नसला तरी या खेळाने वणी शहराची ओळख संपूर्ण विदर्भात पोहचविले आहे. कारण प्रत्येक गावाचे काहींना काही वैशिष्ट्य असते या वैशिष्ट्यामुळे गावाला विशेष महत्व प्राप्त आहे . तसे वणी शहर अनेक वैशिष्टयानी भरलेले शहर आहे.त्यामुळे गुद्दलपेंडी हा खेळ त्यातील एक भाग आहे. हा खेळ होळीच्या पर्वावर खेळला जाणारा खेळ आहे कारण असा खेळ भारतात कुठेच खेळला जात नाही असा दावा वणी वासीयांचा आहे.कारण होळी हा सण संपूर्ण भारत देशात सर्वत्र साजरा केला जातो. आणि विविध प्रकारांनी साजरा होतो व वणीत होळी या सणाचे वैशिष्ट्य आहे तेही गुद्दलपेंडी व महामुर्ख संम्मेलन हे दोन्हीही कार्यक्रम धुलीवंदनाच्या रात्री घेण्यात येते .
वणी शहरात सर्वात जुन्या दोन व्यायाम शाळा आहेत यामध्ये एक शिवाजी व्यायाम शाळा व नृसिंह व्यायाम शाळा आहे . व या संस्था अस्तित्वात आल्या तेव्हा पासून या संस्थेने शे-दोनशेवर्षाच्या ऐतिहासिक परंपरा असलेल्या गुद्दलपेंडी या खेळाची जोपासना केली आहे . परंतु यावर्षी गुद्दलपेंडी चा खेळ जत्रा मैदान सवारी बंगल्याजवळ सायंकाळी 7.00 वाजता दिनांक 3 मार्च 2026 ला रंगणार आहे या खेळाचे आयोजन गुद्दलपेंडी आयोजन समिती वणी यांनी पारंपरिक खेळ गुद्दलपेंडी खेळाची परवानगी बाबतचे निवेदनाचे प्रति उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी व ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन वणी याना देण्यात आले आहे. यामध्ये गुद्दलपेंडी आयोजन समितीचे आयोजक बाबुलाल पोटदुखे, संजय शिवरात्रीवार, सूर्यकांत मोरे, अजय बोबडे, दीपक बोण्डे, दीपक पचारे, दीपक देठे, दिलीप खाडे यांनी या खेळाचे आयोजन केले आहे.




