- वणीत ग्रामजयंती व सत्कार, सोहळा उत्साहात
सुरेंद्र इखारे वणी :- येथील गुरुदेव सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट विठ्ठलवाडी तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी,महाराज यांची जयंती ही वणीत ग्रामजयंती म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. गाव म्हणजे केवळ वस्ती नव्हे तर संस्कार आणि माणुसकीच्या धाग्यांनी विणलेले एक सुंदर ग्राम असून याच भावनेचा प्रत्यय ग्रामजयंती महोत्सवात दिसून आला. घटस्थापना , सामुदायिक ध्यान, प्रार्थना भजन आणि कीर्तनांनी वातावरण भक्तिमय झाले. ग्रामस्थांच्या ओठावर नामस्मरण तर अंतःकरणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार उजळून गेले. यावेळी ग्रामगीतेतील ओवी प्रत्येकाच्या मनात घोळली गेली. ग्रामजयंतीचे औचित्य साधून उत्कृष्ठ वारली चित्रकार तथा पोलीस निरीक्षक शेखर वांढरे ,व्यसनमुक्ती, व स्वच्छतादूत राम झिले , गजानन देवगडे, संतोष खिरटकर यांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रामगीता भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला . ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे, विजया दहेकर , गुणवंत पचारे , ह भ प शरद वैद्य यांनी” गावा गावाशी जागवा भेदभाव हा समूळ मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा.”राष्ट्रसंतांच्या विचारांना उजाळा दिला. शेखर वांढरे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, हा सन्मान आमचा नसून सर्व यशस्वी व्यक्तीच्या कार्याचा गौरव आहेत. अध्यक्षस्थानी,जिल्हा प्रचारक मारोती ठेंगणे उपस्थित होते. शेखर वांढरे, राम झिले , गजानन देवगडे, संतोष खिरटकर सत्कारमूर्ती म्हणून तर राजेंद्र कोरडे अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले . यशस्वितेसाठी प्रमोद राजुरकर, हरीभाऊ भट, पुंडलिक धोबे, संजय खाडे, लक्ष्मण जुमनाके, ज्ञानेश्वर कडुकर, भय्याजी तेजे, भास्कर पत्रकार, बाबाराव कुडमेथे , देविदास शेटे, शंकर किनाके, प्रभा आसेकर , शारदा बलकी, संगीता पेंदोर , रज्जू पारखी, सिंधु गिरडकर , बेबी दानव, रूंदा, पाटेकर, नाना बदखल, मनोहर झाडे व गुरुदेव उपासकांनी सहकार्य केले.