वणी तालुक्याचा दहावीचा निकाल घसरला
2248 पैकी 1932 विद्यार्थी उत्तीर्ण ; 85.84टक्के निकाल
सुरेंद्र इखारे वणी :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागामार्फत घेण्यात आलेली माध्यमिक शालान्त परीक्षा ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत व सुरक्षित वातावरणात घेण्यात आली असून. वणी तालुक्यातून 2248 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 1932 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 3 टक्क्यांनी दहावीचा निकाल घसरला आहे.
आज दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन घोषित करण्यात आला असून वणी तालुक्यातून शिक्षण प्रसारक मंडळाची विद्यार्थिनी कु आरोही प्रमोद ढेंगळे हिने 98.20 टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तसेच लायन्स इंग्लिश मिडीयम स्कुलचा विद्यार्थी अनिकेत मधुकर तुराणकर याला 96.60 टक्के तर तिसरी गव्हर्नमेंट शाळेची विद्यार्थिनी इकरा फातिमा नवेद अहमद शेख हिला 93. 80 टक्के गुण मिळाले आहे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वणी तालुक्याच्या निकालाची टक्केवारी 85. 94 टक्के आहे. वणी तालुक्यात एकूण 43 शाळांमधून 2248 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यामध्ये वणी तालुक्यातील शाळांची टक्केवारी पुढीलप्रमाणे
न्यू इंग्लिश हा. पुनवट 90.48 टक्के, जी. प. हायस्कूल वणी 68.75, एस. पी. एम.हायस्कूल वणी 90.71, आदर्श हायस्कूल वणी 72.72, जनता विद्यालय वणी 86.39, आदर्श हा. घोंसा 87.01, जी. प.हा. कुरई 81.25, नवभारत हा. उकणी 81.81, आदर्श हा. साखरा कोलगाव 70 , विवेकानंद विद्या. नेरड 65,विवेकानंद विद्या. वणी 87.97, गुरुदेव वि. शिरपूर 91.83, पंचशील वि. नांदेपेरा 65.07, नालंदा वि. वेळाबाई 82.35, राष्ट्रीय विद्यालय राजूर 96.03, विवेकानंद विद्यालय कायर 62.50, बालाजी विद्यालय सावर्ला 92, लायन्स इंग्लीश मीडीयम स्कूल वणी 100, नुसाबाई चोपने विद्यालय वणी 83.33, आदर्श विद्यालय शिंदोला 79.48 , आदर्श हा. साखरादरा 85.71, लोकप्रिय वि. पेटूर 92.50, तुकडोजी महाराज वि. भालर 100, बहुउद्देशीय ग्रामीण विकास विद्या. ब्राम्हणी 46.66, जनता वि. मारेगाव( कोरंबी) 97.82, ग्रामीण वि. परमडोह 92.30, भास्करराव ताजने विद्यालय कळमना 90 गिरजाबाई मा. वि. मंदर 83.87,वि . पा. मांडवकर वि. तेजापूर 76.66, राजर्षी शाहू महाराज हिंदी वि. वणी 87.50, सरस्वती माध्यमिक विद्यालय मोहर्ली 100, स्व. बाबा पा.पिंपळकर मा. वि .मेंढोली 81.25 , राष्ट्रीय वि. बोर्डा 87.09, वणी पब्लिक स्कूल वणी 100 , जगन्नाथबाबा वि. वांजरी 79.31,स्व.केशव पा. कातकडे मा. वि. चिखलगाव 57.57, साईकृपा मा. वि. मुर्धोनी 97.36 , लक्ष्मीबाई राजगडकर मा.आश्रम शाळा शिरपूर 77.77, एस. पी. पिंपळकर मा. वि .नायगाव 50, अनु.जाती विद्यालय परसोडा 96.42, संताजी इंग्लीश मी. स्कूल वणी 100, न्यू व्हिजन इंग्लीश मी. स्कूल वणी 94.11 टक्के,प्रयास इंग्लीश मिडीयम स्कुल कायर 100 टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत




