वणीत ईद निमित्ताने शांतता समितीची बैठक
ठाणेदार गोपाळ उंबरकर यांचे सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन
सुरेंद्र इखारे वणी :- येथील पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 23 मे 2026 रोज शनिवारला सायंकाळी 7.00 वाजता 28 मे 2026 रोजी होऊ घातलेल्या ईद सणोत्सवा निमित्ताने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
या शांतता समितीचे मार्गदर्शक ठाणेदार गोपाळ उंबरकर हे होते पोलीस उप निरीक्षक महापुरे, उपनिरीक्षक वडतकर, पो उपनिरीक्षक महानवर,पोलीस सहायक निरीक्षक शेखर वांढरे उपस्थित होते यावेळी पोलीस ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी होऊ घातलेल्या ईद सणानिमित्त सर्व समाजबांधवांना हा सण शांततेत साजरा करावा असे आवाहन करून समाजामध्ये सुरू असलेल्या पती पत्नीच्या भांडणामुळे कुटुंब उध्वस्त होत आहे तेव्हा समाजातील प्रमुखांनी दुरावत चाललेल्या कुटुंबाना समज देण्यासाठी पुढे येऊन सामाजिक सलोखा राखावा असे आवाहन सुद्धा केले आहे. तसेच शांतता समितीचे सदस्य प्रा पुरुषोत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की वणी शहर शांतता प्रिय आहे येथील सर्व उत्सव हे सर्व जाती धर्मातील समाजबांधव एकमेकांचे स्वागत करून उत्सव साजरे करतात त्यामुळे सर्व बांधवांनी ईद साजरी करण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन केले तसेच नईम अजीज म्हणाले ईद निमित्ताने शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाने सहकार्य करावे जेणेकरून उत्सवाला गालबोट लागणार नाही व वणी शहराची शांतता भंग होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली. मंगल तेलंग यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत दुकानांसमोर बोर्ड असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो तेव्हा नगर पालिका प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे याप्रसंगी शांतता समितीचे सदस्य मंगला झिलपे, नइम अजीज, मंगल तेलंग, प्रा पुरुषोत्तम पाटील , नरेंद्र लोणारे, वैजनाथ खडसे, मौलाना,पत्रकार विनोद ताजने , प्रशांत जुमनाके, रमेश तांबे ,परशुराम पोटे, तसेच कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचे आभार पोलीस सहायक निरीक्षक शेखर वांढरे यांनी मानले या सभेच्या यशस्वीतेसाठी गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी, सतीश मुजमुळे, संदीप सोयाम,पोहवा सतीश व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.






