कायरच्या विद्यालयात “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात 14 जुलै 2026 रोज मंगळवारला दुपारी 3.40 वाजता शिक्षणाधिकारी माध्यमिक जी प यवतमाळ यांचे आदेशानुसार इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते, प्रमुख पाहुणे संस्थासचिव सतीश घुले, पालक मनोज झोडे, प्रमुख मार्गदर्शक मधुकर घोडमारे , रविकांत गोंडलावार, सोनाली ठाकूर, विद्यार्थी प्रतिनिधी सुमित शंकावार, सानिका चांदसूर्य, चंचल झोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख मार्गदर्शक मधुकर घोडमारे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विषय कौशल्य आणि पर्यावरण जनजागृती तसेच विद्यार्थ्यांनी पाणी संसाधन, संवर्धन, स्वच्छता या बाबी शिकल्या पाहिजे असे मत व्यक्त करून इको क्लबची स्थापना करण्यात आली यामध्ये वर्ग 10 ची विद्यार्थिनी सानिका चांदसूर्य हिची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तसेच सदस्य चंचल झोडे, गौरी घोंगे, मोहित निमकर, वेदिक पाचभाई, स्नेहा भोस्कर ,दीपक बलकी, मधीया कुरेशी, नैतिक येटे, खुशबू रागुलवार यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थसचिव सतीश घुले ,पालक मनोज झोडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून “एक पेड माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण एक राष्ट्रव्यापी चळवळ म्हणनू सुरू करण्यात आली आहे या वृक्षारोपणातून पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होते तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली ठाकूर यांनी केले तर आभार रविकांत गोंडलावार यांनी मानले . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिपाई आकाश बोरूले, मधुकर कोडापे तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.






