Tuesday, June 16, 2026
Google search engine

गणेशपुर व चिखलगाव येथील जेष्ठ नागरिकांनी आमदार संजय देरकर यांना दिले निवेदन

 गणेशपुर व चिखलगाव येथील जेष्ठ नागरिकांनी आमदार संजय देरकर यांना दिले निवेदन

सुरेंद्र इखारे वणी  :- महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाशी फेस्काॅम शी संलग्न असलेल्या चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर व आदर्श जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ चिखलगाव यांचे कडुन महाराष्ट्र शासनाकडे पाठवायचे मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले.
यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांसाठी लागु असलेली सर्व शासकीय सवलती व कल्याणकारी योजना साठी 60 वर्षापासुन लागु कराव्यात, महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार रुपये आर्थीक मानधन द्यावे,पालक व जेष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण अधिनियम 2007 तसेच या अंतर्गत 2010 च्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, जेष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासातील तिकिट दरात कोविड-19 पुर्वी असलेली 50 टक्के सवलत तात्काळ सुरू करावीत, महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे दोन प्रतिनिधी विधानपरिषदेत पाठवावे,फेस्काॅम च्या राज्यस्तरीय अधिवेशनाची खर्चाची तरतुद राज्य सरकारने करावी, राज्यात स्वतंत्र जेष्ठ नागरिक आयुक्तालय सुरू करावे.
या सर्व मागण्याचे निवेदनावर मा.संजयभाऊ देरकर यांनी सविस्तर चर्चा करून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मागण्यांसाठी मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनकडे पाठपुरावा करून समस्या सोडविण्यासाठी आश्वासन दिले.
निवेदन देते वेळी चैतन्य जेष्ठ नागरिक व आदर्श जेष्ठ नागरिक मंडळाचे प्रतिनिधी श्री.उदयराव गोहोकार,श्री.सुधाकरराव गारघाटे, लक्ष्मण इद्दे,रामदास बोढे, जयप्रकाश राजुरकर, वसंतराव उपरे,दिगंबरराव गोहोकार,नानाजी विधाते व गुलाब निते हजर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular