Sunday, July 26, 2026
Google search engine

शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा व नशामुक्त वातावरण देण्याची गरज – जिल्हाधिकारी विकास मीना

शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा व नशामुक्त वातावरण देण्याची गरज – जिल्हाधिकारी विकास मीना

जिल्हास्तरीय विद्यार्थी सुरक्षा व नशामुक्त शिबीर
सुरेंद्र इखारे वणी :- जिल्हास्तरीय विद्यार्थी सुरक्षा व नशामुक्त शिबिरात जिल्हाधिकारी विकास मीना अध्यक्षस्थानावरून विचार व्यक्त करताना म्हणाले की विद्यार्थी आपल्या शाळेत शिक्षण घेत असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या संपुर्ण सुरक्षिततेची व नशामुक्त वातावरण देण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले.

filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 0;
shaking: 0.843374; highlight: 1; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask: 0;
brp_del_th: 0.0000,0.0000;
brp_del_sen: 0.0000,0.0000;
delta:1;
bokeh:1;
ispap:1;
papproctime: 2026:07:24 16:59:31;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 32768;cct_value: 0;AI_Scene: (13, 0);aec_lux: 268.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;zeissColor: bright;

जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यवतमाळ व यवतमाळ जिल्हा पोलीस यांचे संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील हॉटेल व्हॅनिशीयन येथे दिनांक 24 जुलै 2026 रोज शुक्रवारला दुपारी2.00 वाजता यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक व प्राचार्यांसाठी “ विद्यार्थी सुरक्षा व नशामुक्त शिबिराचे आयोजन केले
जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विकास मीना हे होते, प्रमुख अतिथी पोलीस अधिक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा वाहतूक पोलीस अधिकारी प्रशांत देशमुख, शिक्षणाधिकारी माध्यमिक किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी वंदना नाईक, उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे, विस्ताराधिकारी स्मिता घावडे, विस्ताराधिकारी अनिल शेंडगे, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थान या उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळांनी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूक बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे , वाहतूक करणाऱ्या चालक, मालक , वार्डन व शाळेतील इतर सर्व कर्मचाऱ्यांचे चरित्र प्रमाणपत्र, वाहनांची नियमित तपासणी, करणे गरजेचे आहे. तसेच शाळा परिसरात 100 मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेट, किंवा कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांची विक्री करू देऊ नये, विद्यार्थी अशा व्यसनापासून दूर राहावेत यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी केले सूत्रसंचालन भोयर मॅडम यांनी केले तर आभार शिक्षण विस्ताराधिकारी अनिल शेंडगे यांनी मानले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक , प्राचार्य व केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग व यवतमाळ जिल्हा पोलीस यांनी परिश्रम घेतले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular