Thursday, October 1, 2026
Google search engine

तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धा

तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धा

सुरेंद्र इखारे वणी :- पंचायत समिती वणी, समग्र शिक्षा अभियान शिक्षण विभागाचे वतीने दिनांक 5 ऑक्टोबर 2026 रोजी एस पी एम विद्यालय वणी येथे सकाळी 11.00 वाजता “ सेवा संकल्प अभियान” अंतर्गत तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शासन निर्णयान्वये 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत सेवा संकल्प अभिमान अंतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून तसेच नागरिकाभिमुख विविध सेवा व शासनाच्या विविध योजनांची व उपक्रमांची जनजागृती करण्यासाठी तसेच लाभार्थ्यांशी थेट संवाद साधता यावा या दृष्टीकोनातून तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. तेव्हा  तालुक्यातील  शाळांनी  मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये नाव नोंदवावे असे आवाहन वणी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर  यांनी केले आहे.वणी शिक्षण विभाग येथील बीआरसी साधनव्यक्ती सौ अलका काळे धनलक्ष्मी लक्षशेट्टीवार यांचे कडे संपर्क साधून नाव  नोंदवावे  असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular