Sunday, January 26, 2025
Google search engine

कायर येथील विवेकानंद विद्यालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान 

कायर येथील विवेकानंद विद्यालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान 

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत शालेय आरोग्य आणि प्रतिबंधक उपाय 

सुरेंद्र इखारे वणी :-   कायर येथील विवेकानंद विद्यालयात आज दिनांक 5 डिसेंबर 2024 रोज गुरुवारला दुपारी 1.00 वाजता आयुष्यमान भारत योजने अंतर्गत शालेय आरोग्य आणि प्रतिबंधक उपाय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. प्रमुख अतिथी संस्था सचिव तथा शारीरिक शिक्षक सतीश घुले, आरोग्यवर्धिनीदूत विज्ञान शिक्षक मधुकर घोडमारे, आरोग्यवर्धिनीदूत गणित शिक्षिका सोनाली भोयर, सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार उपस्थित होते. याप्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्यवर्धिनीदूत सोनाली भोयर यांनी केले. तर प्रमुख अतिथी सतीश घुले यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यसंवर्धनाविषयी माहिती दिली. तसेच विद्यालयातील विज्ञान शिक्षक आरोग्यवर्धिनीदूत मधुकर घोडमारे यांनी विद्यार्थ्यांना  आयुष्यमान भारत योजने अंतर्गत शालेय आरोग्य आणि प्रतिबंधित उपाययोजना करणे या उपक्रमाबाबत सखोल माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी शासनाच्या या महत्वकांक्षी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आयुष्यमान भारत योजना ही शाळेमध्ये प्रभावीतपणे राबवून आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारला “ आरोग्यवर्धिनी दिवस” म्हणून राबविण्यात यावा असे सूचित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली भोयर यांनी केले तर आभार रविकांत गोंडलावार यांनी मानले . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील शाळांनायक मयूर खुटेमाटे, रोहन मडावी शिक्षकेत्तर कर्मचारी मधुकर कोडापे, दिलीप कांदसवार, आकाश बोरूले यांनी सहकार्य केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular