कायर येथील विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोज शुक्रवारला दुपारी 1.00 वाजता विश्वरत्न, बोधिसत्व ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी आदरांजली वाहिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. प्रमुख पाहुणे जेष्ठ अध्यापक मधुकर घोडमारे, सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार, सहायक अध्यापिका सोनाली भोयर उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विश्वरत्न बोधीसत्व डॉ भीमराव रामजी आबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान अध्यापक मधुकर घोडमारे यांनी केले. तर विद्यालयातील विद्यार्थी कु साजिया शेख, अशनज खान, आयशा पठाण, प्रविन ढोंगे, अक्षरा उपरे, सानवी चामाटे, कुणाल कोरांगे, तसेच सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्षीय भाषण करताना मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा प्रसंग सांगून विद्यार्थ्यांनी सुद्धा बाबासाहेबा प्रमाणेच आपल्या आईवडिलांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 10 वि ची विद्यार्थिनी कु गौसिया मन्सूर सय्यद हिने केले तर आभार सोनाली भोयर यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मयूर खुटेमाटे, रोहन मडावी, मधुकर कोडापे, दिलीप कंदस्वार, आकाश बोरूले यांनी सहकार्य केले.