Sunday, January 26, 2025
Google search engine

मारेगावात जागतिक एड्स दिनानिमित्त रासेयो कडून  महाविद्यालयात जनजागृती विषयक मार्गदर्शन, पोस्टर स्पर्धा

मारेगावात जागतिक एड्स दिनानिमित्त रासेयो कडून  महाविद्यालयात जनजागृती विषयक मार्गदर्शन, पोस्टर स्पर्धा

सुरेंद्र इखारे वणी   :-    मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय  येथे राष्ट्रीय सेवा योजना व विहान काळजी व आधार केंद्र, यवतमाळ यांच्या माध्यमातून जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. एड्स या आजारासंदर्भात सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, जगभरातून या आजाराचे समूळ नष्ट करणे व या आजारामुळे होणारे मृत्यू रोखणे आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या पीडितांना योग्य उपचार देणे महत्वाचे आहे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र, मारेगाव येथील सौं. संगीता वैद्य मॅडम यांनी एड्स होण्यामागील कारणे व त्यावरील उपाय योजना याबाबत सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले व सोबतच एड्स जनजागृती विषयी प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. विनोद चव्हाण आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना एड्स रोगाविषयाचा इतिहास सांगितला तर प्रा. डॉ. माधुरी तानूरकर मॅडम यांनी आपल्या जीवनशैलीच्या माध्यमातून विविध रोगावर कशा पद्धतीने मात करता येईल याबाबत संवाद साधला.
एड्स दिनाचे औचित साधून पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर पोस्टर्स स्पर्धेत 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असता त्यात प्रथम क्रमांक प्राजक्ता लांबट हिचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक कु. प्राजक्ता लांबट तर आभार प्रदर्शन वैष्णवी ढासले यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. जेणेकर सर, डॉ. कांबळे मॅडम, डॉ. गणगणे मॅडम, प्रा. वांढरे मॅडम उपस्थित होते.
सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. देशमुख सर, प्रा. शेंडे मॅडम, व प्रा. स्नेहल मॅडम व रासेयो विद्यार्थी व आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular