Sunday, January 26, 2025
Google search engine

बसपाव्दारा शौर्य स्तंभास अभिवादन

बसपाव्दारा शौर्य स्तंभास अभिवादन
नागपूर जयंत साठे :- बहुजन समाज पार्टी च्या वतीने कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभाच्या प्रतिकृतीस बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर, नागपूर जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, नागपूर जिल्हा सचिव अभिलेश वाहने यांच्या नेतृत्वात पुष्पचक्र वाहून तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादन समारोह बालाजी नगर त्रिशरण बुद्ध विहार तसेच भदंत आनंद कौशल्यायन नगरातील कल्पतरू बुद्ध विहार परिसरातील शौर्य स्तंभाच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून पार पडला.
आज पासून 207 वर्षांपूर्वी 1 जानेवारी 1818 ला पुण्यातील पेशवाई संपविण्यासाठी इंग्रजांच्या बाजूने महार बटालियनच्या 500 सैनिकांनी लढून पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांचा पराभव केला. पेशवाई संपवणाऱ्या त्या शूरवीरांच्या स्मृतिप्रित्यर्थ भिमा कोरेगाव येथे शौर्यस्तंभ उभारण्यात आला. त्या शौर्य स्तंभाला व त्याच्या प्रतिकृती ला देशभर अभिवादन केल्या जाते. त्यानुसार बसपा कांशीरामजींच्या काळापासून मागील अनेक वर्षापासून हा अभिवादन कार्यक्रम राबवित असल्याची माहिती बसपा नेते उत्तम शेवडे यांनी दिली.
याप्रसंगी प्रामुख्याने महार बटालियन मधून सेवानिवृत्त झालेले कॅप्टन दत्ता गवई, कॅप्टन संजय खंडारे, सुभेदार सुरेश रामटेके, सुभेदार मनोज चव्हाण, हवालदार कवडू तुपे, राजेश बनसोड, अनिल मेश्राम, सुनील वासनिक, मधुकर खरात, दीपक कुसरे, इंद्रपाल कांबळे, अशोक वानखेडे (सर्व हवालदार), भदंत प्रियदर्शी, भदंत धम्मरक्षित यांचे सहित
बसपाचे नितीन वंजारी, विकास नारायणे, वर्षा वाघमारे, संभाजी लोखंडे, जगदीश गेडाम, प्रताप तांबे, हेमंत बोरकर, अनिल मेश्राम, महिपाल सांगोडे, अरुण शेवडे, भीमराव गोंडाने, श्रीकांत हाडके, हरिदास जीवनतारे, शामराव तिरपुडे, संबोधी सांगोळे, देवेंद्र शेलकर, विक्रम तुपे, प्रेम लोखंडे, सुजाता लोखंडे बामसेफ चे जीवन वाळके आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular