दिनेश जयस्वाल यांचे निधन
सुरेंद्र इखारे वणी :- येथील व्यावसायिक तथा बीएसएनएल सिम कार्ड चे विक्रेते दिनेश जयस्वाल यांचे काल मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. काल त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना वनी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचेवर बोरिअरब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एक हसतमुख व मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून वणी मध्ये ते सर्वत्र सुपरीचीत होते. ते आपल्या ग्राहकांना यथायोग्य सेवा देत असे.