▫️वणी वकील संघाचे निवडणुकित ऍड.महाजन यांची अध्यक्ष पदी तर सचिव पदी ऍड. टोंगे यांची निवड
सुरेंद्र इखारे वणी :- वणी वकील संघाची निवडणूक दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात पार पडली. या निवडणुकीत एकता पॅनल व विकास पॅनल चे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या निवडणुकीचा निकाल 25 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता निवडणुक अधिकारी ॲड. शाम गायकवाड यांनी घोषित केला. त्यामध्ये एकता पॅनलचे ॲड. वीरेंद्र महाजन यांची अध्यक्षपदी तर सचिव पदी ॲड. अमोल टोंगे यांना विजयी घोषित करण्यात आले.
बार असोसिएशनची निवडणूक दर तीन वर्षांनी घेतल्या जातात. या निवडणुकीमध्ये विविध वकील आपले अर्ज दाखल करून नशीब आजमावत असतात. वकिलांची निवडणूक असल्याने बुद्धिजीवी लोकांची निवडणूक म्हणून त्याकडे एक गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन आहेत. बुद्धिजीवी लोकांच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे जनतेचे सतत लक्ष लागलेले असतात. दोन्ही पॅनल प्रचंड ताकतीने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करून प्रचार मोहीम राबवत असतात. याशिवाय काही अपक्ष उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहून आपले नशीब आजमाविण्याचा प्रयत्न करीत असतात. बुद्धिजीवी वर्गाची निवडणूक म्हणून जनसामान्याचे या निवडणुकीकडे मोठे लक्ष असते आणि ही निवडणूक अत्यंत चुरशीची होत असते. या निवडणुकीत बाजी कोण मारणार हाच प्रश्न निर्माण असतो. या निवडणुकीत एकता पॅनलने प्रचंड विजय संपादित करत अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, सहसचिव, या पदासह कार्यकारी सदस्य म्हणून 3 अश्या एकूण 7 एकता पॅनलच्या उमेदवारांचा प्रचंड बहुमताने विजयी झाला.
वकील संघाची चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत ऍडव्होकेट वीरेंद्र महाजन यांची अध्यक्ष म्हणून तर सचिव म्हणून ऍड.अमोल टोंगे, उपाध्यक्ष ऍड.यशवंत बर्डे, सहसचिव ऍड.रामेश्वर लोणारे, कार्यकारणी सदस्य म्हणून ऍड.दिलीप परचाके, ऍड.आकाश निखाडे, ॲड. चंदू भगत या एकता पॅनलच्या उमेदवारांना विजय संपादन करण्यात यश मिळाले असून त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी घोषित केले आहे.
ऍड.निलेश चौधरी यांच्या पॅनलचा पराभव झाला असून त्यांना केवळ चार जागेवर विजय संपादित करण्यात यश मिळाले. या चुरशीच्या निवडणुकीत बाजी कोण मारेल हा संभ्रम निर्माण झालेला असताना ऍड.महाजन यांच्या पॅनल ने प्रचंड बहुमताने विजय संपादित करत प्रतिस्पर्धी पॅनलला धुळीस लावले.
एकता पॅनलच्या विजयी उमेदवारांनी विजयाचे श्रेय, ऍड. डी एन लोडे. ऍड. व्हि.डी काकडे. ऍड.व्ही एम कवाडे,ऍड.झेड शरीफ,ऍड.तेलतुंबडे ऍड.बांदुरकर,ऍड. घनश्याम निखाडे यासह अनेक ज्येष्ठ व कनिष्ठ वकिलांना दिले आहे.
ॲड. महाजन, ऍड. टोंगे यांच्या सह सर्व विजयी उमेदवारांवर शुभेच्छाचा प्रचंड वर्षाव होत असून सर्व स्तरातून ऍड. महाजन व त्यांच्या टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे.