वैजनाथ खडसे उत्कृष्ठ शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
सुरेंद्र इखारे वणी :- आदर्श हायस्कूल येथील उपक्रमशील शिक्षक तथा ग्रामगिताचार्य वैजनाथ खडसे यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, व जनहितार्थ कार्याची दखल घेऊन तिरळे कुणबी समाज संघटना तालुका वणी तर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.माजी वैद्यकीय अधिकारी डॉ शांताराम ठाकरे व वसंत मानकर उपाध्यक्ष तिरळे कुणबी समाज संघटना भद्रावती यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सहकुटुंब गौरविण्यात आले. तिरळे कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व समाज मेळावा आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वीही त्यांना असंख्य पुरस्कार प्राप्त झाले असून समाजप्रबोधन कार्यक्रम आजही सुरू आहेत. याप्रसंगी डॉ मोरेश्र्वर महाजन, प्राचार्य प्रशांत गोडे,कार्तिक देवडे, अशोक चौधरी, नीलिमाताई काळे, प्रविण इंगोले आदी समाजातील मान्यवर,व्यक्ती उपस्थित होते. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक समितीचे सचिव तथा कार्यकारी अध्यक्ष जयसिंगराव गोहोकर, सहसचिव महादेवराव वल्लपकर, प्राचार्य आर एल मोहिते, मुख्याध्यापक दयालाल भोयर, प्रा भूमारेड्डी बोदकुरवार, यवतमाळ जिल्हा प्रचार प्रमुख मारोती ठेंगणे, ग्रामगीताचार्य विजयाताई दहेकर चंपत पाचभाई बंडू मत्ते आदींनी अभिनंदन केले असून त्यामुळे परिसरात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.