भालर येथील तुकडोजी महाराज विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन व माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :-तालुक्यातील भालर येथील कै सांबशिव पाटील शिक्षण संस्था भालर द्वारा संचालित तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय भालर येथे दिनांक 27 ते 29 जानेवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे
उद्घाटक मा.श्री.संजयभाऊ देरकर,आमदार वणी विधानसभा क्षेत्र हे होते. अध्यक्षस्थानी मा.श्री.सूनीलभाऊ वरारकर,सचिव कै.संबशिव पाटीलशिक्षण संस्था भालर,संचालक म.श्री दौलतराव पीपराडे व नामदेव पा गोहोकर,प्रमुख अतिथी संजय देठे,श्री गजानन बदखल उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा.डॉ.श्री अरूनभाऊ वरारकर व अध्यक्ष गाडगे महाराज विद्यालय अंतर्गाव मां श्री रविभाऊ एम्बडवार,उद्घाटक म्हणून तर प्रमुख पाहुणे मा.श्री हुसैन बाशा मॅनेजर रॉकवेल मिनरल सरपंच श्री नारायण वरारकर यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला 800 माजी विद्यार्थी उपस्थित होते त्यांचा परिचय झाला नंतर त्यांनी गायन,नृत्य,समूह नृत्य,भाषण,मनोरंजनात्मक खेळ इत्यादी कार्यक्रम साजरे केले उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा मोमेटो देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोज वरारकर सर,शिक्षक श्री. ढेंगले सर, श्री.खिरटकर सर, श्री.वारपटकर सर, श्री.अडबाळे सर,खुजे सर,जेऊरकर सर,कु.कविता लांडे मॅडम,कू.नलिनी उपरे मॅडम धेंगळे बाबू,भास्कर हेपट,सुरेश हेपाट,बंडू धोंगडे धनराज वाघमारे आदी उपस्थित होते